लाडक्या बहीण योजनेची रक्कम वाढवणार; वाचा आता तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

On: February 2, 2026 6:14 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजने संदर्भात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सध्या या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जात आहेत. मात्र, आता ही रक्कम वाढवण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट संकेत दिले असून, लवकरच महिलांना अधिक आर्थिक मदत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना त्यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू केली होती. या योजनेचा महिलांमध्ये मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं आणि त्याचा राजकीय लाभही सत्ताधारी पक्षाला झाला. निवडणूक प्रचारादरम्यान लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, सरकार स्थापन होऊन दीड वर्ष उलटून गेल्यानंतरही या रकमेत वाढ झालेली नव्हती. त्यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजी दिसून येत होती. आता मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यामुळे आशा पुन्हा जागी झाली आहे.

1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचा शब्द पूर्ण करणार :

एकनाथ शिंदे (Eknayh shinde) यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि या योजनेला कोणीही थांबवू शकत नाही. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत सांगितलं की, सत्ता येते जाते, पण माणसांच्या मनात निर्माण झालेलं प्रेम आणि विश्वास कायम राहतो. “मी दिलेला शब्द पाळणारा आहे. आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि तो शब्द आम्ही पूर्ण करणार आहोत,” असं शिंदे यांनी ठामपणे सांगितलं. (Ladki Bahin Yojana News)

याआधीही एक-दोन वेळा त्यांनी योजनेच्या रकमेत वाढ होणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांनी अधिकृतपणे ही घोषणा केल्यामुळे लवकरच शासन स्तरावर यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यातील लाखो महिलांना या निर्णयाचा थेट फायदा होणार असून, त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana | महिलांसोबतच शेतकरी कर्जमाफीवरही संकेत :

या भाषणात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केवळ लाडकी बहीण योजनेपुरतेच न थांबता शेतकरी कर्जमाफीबाबतही भूमिका स्पष्ट केली. “शेतकरी कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेऊ,” असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आगामी काळात ग्रामीण भागासाठीही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा थेट आर्थिक मदत मिळत असल्यामुळे घरखर्च, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजांसाठी मोठा आधार मिळत आहे. या रकमेत वाढ झाल्यास महिलांना अधिक आर्थिक स्थैर्य मिळेल, असं मत सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे आता शासन कधी अधिकृत आदेश काढते आणि प्रत्यक्ष खात्यात वाढीव रक्कम कधी जमा होण्यास सुरुवात होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title: Ladki Bahin Yojana Amount to Increase: Eknath Shinde Announces ₹2100 Monthly Support

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now