लाडक्या बहीणींना एप्रिल-मे महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार?, मोठी अपडेट समोर

On: May 2, 2025 9:46 AM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी महत्वाची बातमी आहे. लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही, त्यामुळे आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत लवकरच सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. (Ladki Bahin Yojana )

एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता कधी?

लाडकी बहिण योजना ही महायुती सरकारच्या सर्वात प्रभावशाली योजनांपैकी एक असून, योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 ची मदत दिली जाते. मात्र एप्रिल महिना संपूनही लाभार्थींना हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी पसरली असून, सरकारकडून स्पष्ट घोषणा न झाल्यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र काही मीडिया रिपोर्टनुसार, मे महिन्यात दोन्ही हप्ते म्हणजे एकूण ₹3000 एकत्रच लाभार्थींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. याआधीही फेब्रुवारी व मार्च महिन्याचे हप्ते एकत्र देण्यात आले होते.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच तांत्रिक कारणांमुळे हप्त्याच्या वाटपात विलंब झाल्याचे समजते. सरकारने यापूर्वी वेळोवेळी सांगितले आहे की, पात्र महिलांना नियमित स्वरूपात रक्कम देण्यात येईल.

2.47 कोटी महिलांना योजनेचा लाभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून राबवली जात आहे. या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनवणे आहे. योजनेअंतर्गत त्या महिलांना ₹1500 मासिक आर्थिक मदत दिली जाते, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी आहे. एक कुटुंबातील दोन महिलांना याचा लाभ मिळतो. राज्यात सध्या सुमारे 2 कोटी 47 लाख महिला या योजनेसाठी पात्र आहेत आणि आतापर्यंत 9 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. (Ladki Bahin Yojana )

योजनेसाठी पात्रतेचे निकष-

  • महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी
  • एका कुटुंबातील 2 महिलांनाच लाभ
  • इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांना वगळण्यात आले आहे

Title : Ladki Bahin Yojana 3000 April-May Payment Likely Soon

 

Join WhatsApp Group

Join Now