‘तिने मला धर्मांतर…’; कुशल टंडनचा गौहर खानबाबत धक्कादायक खुलासा

On: May 26, 2025 12:03 PM
Kushal Tandon, Gauhar Khan
---Advertisement---

Kushal Tandon | टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता कुशल टंडन (Kushal Tandon) त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री शिवांगी जोशीला डेट करत असला तरी, शिवांगीच्या आधी त्याच्या आयुष्यात ‘बिग बॉस’ विजेती गौहर खान होती. गौहर खान (Gauahar Khan) आणि कुशल टंडन यांचे रिलेशनशिप सर्वश्रुत होते, परंतु काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी ब्रेकअप केले. यामागचे कारण खुद्द कुशलने एका मुलाखतीत सांगितले असून, ते अत्यंत धक्कादायक आहे.

कुशल टंडनचा धक्कादायक खुलासा

कुशलने गौहरसोबत ब्रेकअपचे कारण धर्म असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. धर्मावरून समस्या होती, म्हणून आम्ही ब्रेकअपचा निर्णय घेतला, असे तो म्हणाला. “गौहरसोबत माझं नातं खूप चांगलं होतं. पण जेव्हा धर्मावरून काही समस्या जाणवल्या, तेव्हा मी त्यातून मार्ग काढण्याचा खूप प्रयत्न केला. दुर्दैवाने आम्हाला आमच्या प्रेमाचा त्याग करावा लागला. कदाचित आम्ही एकमेकांसाठी बनलोच नव्हतो,” अशा शब्दांत कुशलने आपली भावना व्यक्त केली.

कुशलने पुढे असेही स्पष्ट केले की, “गौहरने मला माझा धर्म बदलण्यास सांगितलं होतं. माझ्यासाठी ते शक्य नव्हतं. प्रेम सर्वकाही आहे, परंतु आयुष्यात फक्त ती एकच गोष्ट नाही.” या खुलाशाने नेटकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आणि त्यांनी गौहरला खूप ट्रोल केले. त्यावर गौहरनेही सडेतोड उत्तर दिले होते.

ट्रोलर्सना गौहर खानचे सडेतोड उत्तर

गौहर खानने या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देताना म्हटले होते, “मी मुस्लीम आहे आणि कोणीच आपल्याला आपले अधिकार मिळवण्यापासून दूर करू शकत नाही. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे, इथे लोकशाही आहे. इथे हुकुमशाही चालत नाही.” कुशलशी ब्रेकअपनंतर गौहरने झैद दरबारशी लग्न केले असून, ती तिच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहे.

या घटनेमुळे सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यातील धर्मासारख्या संवेदनशील मुद्द्यांवरून होणारे वाद पुन्हा एकदा समोर आले आहेत. प्रेमसंबंधांमध्ये धर्मामुळे निर्माण होणारे अडथळे आणि त्यातून उद्भवणारे वैयक्तिक संघर्ष यावर या प्रकरणात प्रकाश टाकला आहे.

Title: “She Asked Me to Convert”: Actor Reveals Shocking Reason Behind Breakup

 

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now