मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर; ‘या’ मराठी अभिनेत्याचं निधन

On: May 5, 2024 1:53 PM
Kshitij Zarapkar passed away
---Advertisement---

Kshitij Zarapkar passed away | मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे.प्रसिद्ध मराठी अभिनेते क्षितीज झारापकर
यांचं आज (5 मे )निधन झालं आहे. क्षितिज यांनी अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांत विविध भूमिका साकारल्या होत्या.

आज वयाच्या 54 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या वृत्तामुळे सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.अभिनेते क्षितीज झारापकर यांचं दादरच्या घरी कर्करोगामुळे निधन झालंय.

अभिनेते क्षितीज झारापकर यांचं निधन

त्यांनी एकुलती एक, आयडियाची कल्पना, गोळाबेरीज, इश्श्य यांसारख्या चित्रपटांत काम केलंय. या चित्रपटातील त्यांच्या मुख्य भूमिका लोकप्रिय झाल्या होत्या.आता त्यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. एक अभ्यासू नट, एक अभ्यासू दिग्दर्शक अशी क्षितीज यांची ओळख होती.

क्षितीज झारापकर हे ‘चर्चा तर होणारच’ या नाटकामध्ये दिसून आले होते. त्यांच्यासोबत या नाटकात आस्ताद काळे आणि अदिती सारंगधर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. क्षितीज (Kshitij Zarapkar passed away) यांना काही काळापूर्वी कर्करोगाचं निदान झालं होतं.

मनोरंजन क्षेत्रातून हळहळ

त्यांच्यावर कर्करोगाच्या आजारामुळे बऱ्याच दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्यांचं निधन झालं. क्षितीज झारापकर यांच्या अनेक सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. गोळाबेरीज, बायकोच्या नकळत यांसारख्या अनेक सिनेमांचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. त्याचप्रमाणे ठेंगा, एकुलती एक यांसारख्या सिनेमातून त्यांनी अभिनेता म्हणूनही प्रेक्षकांची मनं जिंकली.

दरम्यान, दुपारी दीड ते दोन वाजताच्या सुमारास त्यांचे पार्थिव दादर शिवाजी पार्क येथील त्यांच्या राहत्या घरी अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 3.30 च्या सुमारास त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

News Title – Kshitij Zarapkar passed away

महत्त्वाच्या बातम्या-

पहाटेच्या शपथविधीबाबत श्रीनिवास पवारांचा मोठा गौप्यस्फोट!

महाराष्ट्र हादरला! किराणा मालाच्या दुकानातून होतेय ड्रग्जची विक्री

Post Office ची कमाल योजना; ‘या’ योजनेतून महिन्याला मिळेल 20 हजार रूपये

मोहित कंबोज यांच्या ट्विटने राजकारणात खळबळ!

सोनं पुन्हा महागलं! ग्राहकांच्या खिशाला झळ; जाणून घ्या आजचे दर

Join WhatsApp Group

Join Now