छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केआरकेचं वादग्रस्त वक्तव्य; देवेंद्र फडणवीसांनी दिले महत्त्वाचे आदेश

On: February 18, 2025 4:05 PM
KRK Offensive Post About Chhatrapati Sambhaji Maharaj
---Advertisement---

KRK Offensive Post | स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खान (KRK Offensive Post) ऊर्फ केआरके (KRK) याने एक्स (X) (ट्विटर – Twitter) अकाऊंटवर (Account) छत्रपती संभाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Sambhaji Maharaj) आक्षेपार्ह पोस्ट (Offensive Post) लिहिली आहे. केआरकेने (KRK) छत्रपती संभाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Sambhaji Maharaj) ट्विट (Tweet) करताना सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी कठोर भूमिका घेतली आहे.

फडणवीसांचे (Fadnavis) आदेश

केआरकेने (KRK) विकिपीडियाचा (Wikipedia) आधार घेत पोस्ट लिहिली होती. विकिपीडियाशी (Wikipedia) संपर्क साधून वादग्रस्त मजकूर काढण्याचे आदेश फडणवीस (Fadnavis) यांनी दिले आहेत. सायबर विभागाचे (Cyber Department) आयजी (IG) यशस्वी यादव (Yashasvi Yadav) यांना फडणवीसांनी (Fadnavis) हे आदेश दिले आहेत.

फडणवीसांची प्रतिक्रिया

“विकिपीडियावर (Wikipedia) छत्रपती संभाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Sambhaji Maharaj) जो वादग्रस्त मजकूर लिहिण्यात आला आहे, त्याप्रकरणी सायबर विभागाचे (Cyber Department) आयजी (IG) यशस्वी यादव (Yashasvi Yadav) यांच्याशी संपर्क साधला आहे. विकिपीडिया (Wikipedia) आणि त्याच्याशी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून तो मजकूर काढून टाकण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. त्यासाठी जी प्रक्रिया करावी लागेल, ती तातडीने करावी, असं त्यांना सांगण्यात आलं आहे. अशा पद्धतीचा आक्षेपार्ह मजकूर ओपन सोर्सवर (Open Source) राहणं अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे ते तिथून काढून टाकण्यासाठीचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) हे आमचे आदर्श आहेत, त्यांच्यासंदर्भात असले लेखन खपवून घेणार नाही”, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी (Fadnavis) दिली.

नियमावली बनवण्यावर भर

“विकिपीडियावरील (Wikipedia) मजकूर ठराविक लोकांना एडिट (Edit) करता येतो. आम्हाला कल्पना आहे की ते भारतातून संचालित होत नाही. त्यांचे काही नियम आहेत. ज्यांच्याकडे त्याचे एडिटोरीयल राईट्स (Editorial Rights) असतात, त्यांच्यासाठी ऐतिहासिक गोष्टींबद्दल लिहिण्यासाठी काही नियमावली आखली जाऊ शकते का, याबद्दल आम्ही चर्चा करणार आहोत. ओपन सोर्सवर (Open Source) अशा पद्धतीने ऐतिहासिक गोष्टी तोडून-मोडून लिहिणाऱ्यांविरोधात नियमावली तयार करा, अशा सूचना आपण देऊ. भौगोलिक रचनेमुळे नियमावली आणणं सोपं होतं, पण सोशल मीडियाची (Social Media) भौगोलिक चौकट नसल्याने नियम आणणं कठीण आहे. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असीमित नाही. दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालू शकत नाही,” असेदेखील फडणवीस (Fadnavis) म्हणाले. (KRK Offensive Post)

ज्याठिकाणी अश्लीलता मर्यादेच्या बाहेर जाते, त्याठिकाणी कारवाई करणे गरजेचे असते. यासंदर्भात काही नियमावली करता येईल का, याबाबत आमची केंद्र सरकारशी (Central Government) चर्चा सुरू आहे, असंही फडणवीसांनी (Fadnavis) स्पष्ट केलं.

Title : KRK Offensive Post About Chhatrapati Sambhaji Maharaj

 

Join WhatsApp Group

Join Now