‘आमच्या दोघांच्या घरूनही…’; रिंकूसोबतच्या फोटोबाबत कृष्णराज महाडिकांनी केला खुलासा

On: February 12, 2025 5:37 PM
Krishnaraj Mahadik
---Advertisement---

Krishnaraj Mahadik | राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचे धाकटे चिरंजीव कृष्णराज महाडिक (Krishnaraj Mahadik) आणि ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) यांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या नात्याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. विशेषतः कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात काढलेल्या या फोटोमुळे अनेकांनी त्यांचे लग्न ठरल्याची शक्यता वर्तवली. मात्र, आता कृष्णराज महाडिक यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

कृष्णराज महाडिक यांची स्पष्ट प्रतिक्रिया

या चर्चांनंतर कृष्णराज महाडिक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “रिंकू माझी चांगली मैत्रीण आहे, पण सगळ्यांना वाटतंय तसं काहीच नाही.” ते एका मुलाखतीत बोलत होते.

त्यांनी पुढे सांगितले की, “कोल्हापुरात एका कार्यक्रमानिमित्त रिंकू राजगुरू आली होती. त्या वेळी आमची भेट झाली आणि आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला एकत्र गेलो. तिथे फोटो काढला गेला आणि आमच्या ऑफिस टीमने तो पोस्ट केला. मात्र, त्यानंतर अनेक अफवा पसरू लागल्या.”

“कृपया वेगळा अर्थ काढू नका”

कृष्णराज महाडिक यांनी पुढे सांगितले, “या अफवांमुळे आमच्या दोघांच्या घरूनही विचारणा होत आहे की, नेमकं काय चाललं आहे? आम्ही दोघंही ठरवूनच भेटलो आणि दर्शन घेतलं, पण फोटोचा वेगळा अर्थ काढला जातोय.”

त्यामुळे कृष्णराज महाडिक यांनी स्पष्ट केले की, “आम्ही केवळ चांगले मित्र आहोत आणि आमच्या नात्यात लग्नासारखे काहीच नाही.”

Title : Krishnaraj Mahadik Denies Rumors About Rinku Rajguru Relationship

 

Join WhatsApp Group

Join Now