शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, किसान क्रेडिट कार्डबाबत नवीन नियम लागू होणार

On: March 31, 2025 8:09 AM
Kisan Credit Card Limit Increased to 5 Lakh
---Advertisement---

Kisan Credit Card | आगामी आर्थिक वर्ष 2025-26 पासून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा बदल लागू होत असून, किसान क्रेडिट कार्डाच्या (Kisan Credit Card) मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता KCCच्या माध्यमातून शेतकरी 5 लाख रुपयेपर्यंत कर्ज घेऊ शकणार आहेत, यामुळे शेतीच्या भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. ( Kisan Credit Card)

अर्थसंकल्पात मोठी घोषणा, KCCची मर्यादा वाढली

केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget) अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी किसान क्रेडिट कार्ड कर्ज मर्यादा पूर्वीच्या 3 लाख रुपयांवरून वाढवून 5 लाख रुपये करण्याची घोषणा केली होती. KCCच्या माध्यमातून शेतकरी बियाणे, खते, कीटकनाशके, तसेच इतर कृषी साहित्य खरेदी करू शकतात. याशिवाय पीक काढणीदरम्यानही या रकमेचा उपयोग करता येतो.

2019 पासून या योजनेत पशुपालन, डेअरी उद्योग आणि मत्स्यपालन यांचाही समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे या क्षेत्रात कार्यरत शेतकऱ्यांनाही या क्रेडिट कार्डचा लाभ घेता येतो. KCCच्या माध्यमातून शेतीसाठी लागणाऱ्या तातडीच्या आर्थिक गरजा सहज भागवल्या जातात आणि त्यामुळे खासगी सावकारांवर अवलंबून राहण्याची गरज उरत नाही.

दहा लाख कोटींचे वितरण, 7.72 कोटी शेतकऱ्यांना लाभ

31 डिसेंबर 2024 पर्यंत किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना एकूण 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. याचा थेट लाभ 7.72 कोटी शेतकऱ्यांना झाला आहे. 2014 मध्ये ही रक्कम केवळ 4.26 लाख कोटी होती, त्यामुळे या योजनेच्या व्याप्तीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.

केंद्र सरकारने कृषी मंत्रालयाच्या एकूण निधीत कपात करत तो 275 टक्क्यांनी घटवून 1.37 लाख कोटी रुपये केला आहे. मात्र दुसरीकडे, मत्स्यपालन, पशुपालन आणि डेअरी या क्षेत्रासाठीचा निधी 37 टक्क्यांनी वाढवून तो 7544 कोटी रुपये केला गेला आहे. खाद्य प्रक्रिया उद्योगासाठीही सरकारने 4364 कोटी रुपयांची तरतूद केली आहे, जेणेकरून संपूर्ण अन्न उत्पादन साखळी मजबूत करता येईल.

Title : Kisan Credit Card Limit Increased to 5 Lakh

 

Join WhatsApp Group

Join Now