Kiran Sarnaik | राज्याच्या राजकारणातून एका वाईट बातमी समोर आली आहे. आमदार किरण सरनाईक (Kiran Sarnaik) यांच्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला. किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील 5 नातेवाईकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर येथे ही घटना घडली आहे.
किरण सरनाईक यांच्या गाडीचा अपघात
अपघातामध्ये किरण सरनाईक (Kiran Sarnaik) यांचे पुतणे रघुवीर सरनाईक यांचा अपघात झाला आहे. अपघात झालेल्यांना अकोला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आलीये.
कारमधून किरण सरनाईक (Kiran Sarnaik) यांचा भाऊ, भावाचा मुलगा, मुलगी आणि नात प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. सध्या गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू आहे. वाशिम रोडवर दोन्ही कार एकमेकांवर आदळून धडक झाल्याने ही घटना घडली आहे. या अपघातात किरण सरनाईक (Kiran Sarnaik) यांचे पुतणे रघुवीर सरनाईक (28 वर्षे) यांचा मृत्यू झाला.
शिवाजी आमले वय (30 वर्षे), सिद्धार्थ इंगळे वय (35 वर्षे), तसेच एका नऊ महिन्याच्या बाळासोबत पाच जणांचा अपघात झाला. तेव्हा जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. तसेच गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली आहे. ताबडतोब रूग्णवाहिका आणि अपघाताची माहिती देण्यात आली.
शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात
दरम्यान, नुकतीच एक शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचाही भीषण अपघात झाल्याती माहिती समोर आलीये. शरद पवार (Sharad Pawar) आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. चोपडा येथील सभा आटोपून ते भुसावळकडे जात असताना हा अपघात झाला. शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन गाड्या एकमेकांवर आदळल्याची माहिती समोर आलीये. यावल तालुक्यात भुसावळ-यावल रस्त्यावर हा अपघात घडला.
News Title – Kiran Sarnaik Family Car Accident In Five Killed
महत्त्वाच्या बातम्या
सर्वात मोठी बातमी! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात
“स्वतःच्या बिझनेसच्या फायद्यासाठी संसदेत…”; अमोल कोल्हेंच्या आरोपांनी शिरुरच्या राजकारणात खळबळ
“कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून शोभते का?”; रोहित पवारांचं मोदींना प्रत्युत्तर
राज ठाकरेंच्या जवळच्या नेत्यावर अत्यंत गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ
महायुतीला पाठिंबा जाहीर करताच अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यावरील जप्ती मागे






