चित्रा वाघ यांनी तोंड उघडलं त्यांचे खूप आभार…- किरण माने

On: May 3, 2024 6:15 PM
Kiran Mane reaction to Chitra Wagh allegation on porn
---Advertisement---

Kiran Mane | राज्यात सध्या ‘पॉर्न’वरुन राजकारण तापलं आहे. ठाकरे गटाच्या जाहिरातीने एक वेगळाच वाद निर्माण केलाय. उबाठा गटाने राजकीय जाहिरात करताना ‘अ‍ॅडल्ट स्टार’चा वापर केला, असा आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केलाय. इतकंच नाही तर, हा पॉर्न अभिनेता तुम्ही जाहिरातीत घेतलाच कसा?, असा सवालही वाघ यांनी ठाकरे गटाला केला आहे. यावरून आता प्रचंड वाद निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवरच मराठी अभिनेते तथा ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी चित्रा वाघ यांच्या आरोपांची लिंक थेट गृहमंत्रालयाशी जुळवली आहे. किरण माने यांनी केलेल्या गौप्स्फोटामुळे हा वाद आता अजूनच चिघळण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले किरण माने?

भाजपच्या कुठल्याही नेत्यानं एखादं उथळ विधान केलं की, जे उगाचंच लक्षवेधी ठरत असेल तर ओळखायचं की, त्यांना मुळ मुद्द्यावर बोलायचं नाही. त्यांना मूळ मुद्दयापासून भरकटवायचं असतं. लोक, महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा याबाबत प्रश्न विचारू लागले आहेत. मग, कुठल्यातरी एका नेत्याला पिन मारायची, तू काहीतरी विधान कर, त्यावर गाजवू दे, बोलत बसू दे त्यांना, असे म्हणत भाज नेत्यांच्या उथळ व वादग्रस्त विधानामागचं राजकारणच किरण माने (Kiran Mane) यांनी सांगितलं आहे.

“भारतात पॉर्न फिल्म बॅन असूनही..”

यावेळी किरण माने यांनी चित्रा वाघ यांनी भारतातील पॉर्नबद्दल उघडकीस आणले त्याबद्दल त्यांचे आभार मानले. चित्रा वाघ यांनी तोंड उघडलं त्यांचे खूप आभार. भारतात पॉर्न फिल्म बॅन आहे, पण जर भारतात पॉर्न फिल्म बनत असतील तर हे सरकारचं आणि गृहमंत्रालयाचं फार मोठं अपयश आहे. त्यामुळे जनतेनं मतदान करताना हे लक्षात ठेवायला हवं, असं म्हणत किरण माने यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली.

“आपल्या 7 कुस्तीगीर महिला सांगत होत्या, आमच्यावर लैंगिक शोषण होत आहेत, तिकडेही दुर्लक्ष केलं. तर, कालच त्यांचा एक नेता 3 हजार महिलांवर अत्याचार करुन पळून गेलाय, जो त्यांच्या स्टेजवर वावरत होता. आता, चित्राताईंनी गौप्यस्फोट केलाय की भारतात पॉर्न फिल्म बनतात, तिथे लहान मुलींचा वापर केला जातो. त्यामुळे, चित्राताईंचे खूप आभार.”, असं खोचकपणे किरण माने (Kiran Mane) म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

ठाकरे गटाने महिला अत्याचाराच्या संबंधीत एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार असून त्याने उल्लू अॅपमधील वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. त्यात हा कलाकार महिलांचे शोषण करतो, असा दावा चित्रा वाघ यांनी केला होता. तसेच अशा कलाकाराला जाहिरातीमध्ये घेऊन त्यांनी महिला अत्याचारावर जाहिरात कशी केली?, असा सवाल चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी केला. यावरून राज्यात नवा वाद सुरू झाला आहे.

News Title : Kiran Mane reaction to Chitra Wagh allegation on porn

महत्त्वाच्या बातम्या-

राज ठाकरेंच्या जवळच्या नेत्यावर अत्यंत गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

महायुतीला पाठिंबा जाहीर करताच अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यावरील जप्ती मागे

सलमानने ऐश्वर्या नाही तर ‘या’ मुलीला घातलेली लग्नाची मागणी!

चित्रा वाघ नव्या संकटात, ‘त्या’ अभिनेत्याने समोर येऊन केली मोठी मागणी

स्वप्नांचा चक्काचूर; T20 World Cup मध्ये ‘या’ खेळाडूला डच्चू, वडिलांनी व्यक्त केली नाराजी

Join WhatsApp Group

Join Now