Kiran Mane | राज्यात काल 13 मे रोजी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. राजकीय नेते आता पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी सभांचा धडाडा लावत आहेत. अशात महाराष्ट्रात सध्या राज ठाकरे आणि महाविकास आघाडी असा संघर्ष पाहावयास मिळत आहे. राज ठाकरे यांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी बऱ्याच ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा देखील घेतल्या आहेत.
अशात राज ठाकरे यांचा जुना व्हिडिओ आता विरोधकांकडून व्हायरल केला जातोय. भाजप नेते ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा आरोप ठेवण्यात आला आहे. या आरोपांनंतर भाजपने उत्तर प्रदेशातील कैसरगंज मतदारसंघातून ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा करण भूषण यांना उमेदवारी दिली आहे.
ब्रिजभूषण विरोधात कारवाईचे पत्र खोटे?
अशात विरोधकांनी राज ठाकरे यांचा एक जुना मुद्दा प्रकाशात आणला आहे. “महिला कुस्तीगीरांनी ज्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत त्या ब्रिजभूषणवर कारवाई करा.”, अशा आशयाचे पत्र राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं असल्याचं त्यांनीच जाहीर केलं होतं. मात्र, या पत्राबाबत आता खरी हकीकत समोर आली आहे. अभिनेते तथा ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुक पोस्ट करत याबाबत मोठा खुलासा केला आहे.
माने यांनी राज ठाकरे यांनी पत्र पाठवलच नसल्याचं म्हटलंय. इतकंच नाही तर, ही सगळी त्यांची स्टंटबाजी असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. याबाबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील खुलासा केलाय. अशात किरण माने यांची फेसबुक पोस्ट आता चर्चेत आलीये.
किरम माने यांची पोस्ट व्हायरल
“महिला कुस्तीगीरांनी ज्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत त्या ब्रिजभूषणवर कारवाई करा.” अशा आशयाचे पत्र राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधानांना पाठवले आहे असे राज ठाकरेंनी जाहीर केले होते. एक वर्षापूर्वी, 31 मे रोजी सोशल मिडीयावर ते पत्र पोस्ट केले गेले. ते पत्र प्रचंड व्हायरल झाले होते. “ब्रिजभूषणला आम्ही मुंबईत पाऊल ठेवू देणार नाही.” असा इशाराही दिला होता.
…हा स्टंट असणार असा संशय काही जणांना आला.ईडीच्या भितीने घाबरलेले राजजी हे धाडस करणार नाहीत अशी बर्याच जणांना खात्री होती. शेवटी माहितीच्या अधिकारात एकाने याविषयी अर्ज करून विचारणा केली. पंतप्रधान कार्यालयाकडून असे उत्तर आले की,
“राज ठाकरे यांच्याकडून असे कुठलेही पत्र पंतप्रधान कार्यालयाला आलेले नाही.” केवढी मोठी चालबाजी होती ही!
‘खोट्या भूलथापा देऊन जनतेच्या भावनांशी..’
सुषमा अंधारेताईंनी काल अणुशक्तीनगर येथे हा पर्दाफाश केला तेव्हा मी तिथे हजर होतो. उपस्थित प्रचंड जनसमुदायातून “शेSSSम शेSSSSम” असा खुप मोठा आवाज येऊ लागला. लोकांना मनापासून या फसवणुकीचे वाईट वाटलेले दिसले.
राजकीय नेत्यांनी कायम एक लक्षात ठेवावे. एकवेळ तुम्ही निष्क्रिय असा, जनता खपवून घेईल… पण खोट्या भूलथापा देऊन जनतेच्या भावनांशी खेळू नका. आधीच या देशातले सर्वसामान्य नोकरदार, छोटे व्यावसायिक, गोरगरीब मजूर, शेतकरी, कष्टकरी आणि महिला नाडले गेलेले आहेत… जगणं हराम झालंय… त्यात तुम्ही असा थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका. बास. अशी पोस्ट किरण माने (Kiran Mane) यांनी केली आहे.
News Title : Kiran Mane Post on Raj Thackeray
महत्त्वाच्या बातम्या-
शेतकऱ्यांनो तयारीला लागा; राज्यात ‘या’ तारखेला मान्सून दाखल होणार
आनंदाची बातमी! सोन्याच्या किंमतीत घसरण; जाणून आजचे दर
महाराष्ट्रात पुन्हा पाय पसरतोय कोरोना, पुणेकरांसाठी धोक्याची घंटा
बाईक लव्हर्ससाठी आनंदाची बातमी! भन्नाट फीचर्ससह BMW कंपनीची बाईक लाँच
…असं करायला उद्धव ठाकरेंना लाज वाटत नाही का? ‘या’ बड्या नेत्यानी काढली ठाकरेंची इज्जत






