Kiran Mane | कान्स येथे मोठं फिल्म फेस्टिव्हल नुकतंच पार पडलं आहे. या सोहळ्याला बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या रायने देखील आपली उपस्थित दर्शवली होती. कान्स फिल्म फेस्टिव्हल हा जगभरातील मोठा फिल्म फेस्टिव्हल असतो. या सोहळ्याकडे जगातील चित्रपट अभ्यासकांचं लक्ष लागलं आहे. याच चित्रपटात मराठी अभिनेत्री छाया कदमला तिच्या अभिनयासाठी स्टँडिंग ओवेशन मिळालं. तिने काम केलेल्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ या सिनेमाला कान्स फिल्म फेस्टिव्हलला मानाचा ग्रान प्री पुरस्कार मिळाला. (Kiran Mane)
तसेच ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ सिनेमात अभिनेत्री छाया कदमने काम केलं आहे. अशातच आता मराठी मालिकेतून लोकांच्या घराघरात पोहोचलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी छाया कदम यांचं काम पाहता एक फोटो शेअर केला आणि छाया कदम यांना फेसबुकच्या माध्यमातून शुभेच्छा देत पोस्ट केली.
फेसबुक पोस्ट
आज भारतीय सिनेमाक्षेत्रात प्रोपोगंडा आणि सुमारांची सद्दी असण्याच्या काळात असं काही घडलं की लै लै लै दिलासा मिळतो ! जगभरातल्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्याया ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये पायल कपाडियाच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’ सिनेमाला सगळ्यात मानाचा ग्रान प्री पुरस्कार मिळाला. एवढेच नाही तर फिल्म स्कूल्ससाठी असलेल्या शाॅर्ट फिल्म स्पर्धेत चिदानंद नाईक याच्या ‘द सनफ्लॅावर्स वर द फर्स्ट टू नो’ या शाॅर्ट फिल्मला अवाॅर्ड मिळालं. आणि तिसरी आनंदाची गोष्ट म्हणजे बल्गेरिअन दिग्दर्शक काॅन्स्टॅन्टीन बोयानोव च्या ‘द शेमलेस’ या चित्रपटातल्या भुमिकेबद्दल भारतीय अभिनेत्री अनुसूया सेनगुप्ताला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. भारतीय अभिनेत्रीला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला असल्याचं किरण माने (Kiran Mane) म्हणाले आहेत,
“तू भारतीय सिनेमातली खुप महत्त्वाची अभिनेत्री”
सर्वोत्कृष्ट ठरलेल्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाईट’मध्ये आपली मराठमोळी अभिनेत्री… माझी मैत्रीण छाया कदम आहे, याचा खुप खुप अभिमान आहे. छाया, पुर्वीपासून मी तुला म्हणतो तू भारतीय सिनेमातली खुप महत्त्वाची अभिनेत्री ठरणार आहेस. आता ते सिद्ध होतेय. तुझे मनापासून अभिनंदन, अशी पोस्ट किरण माने (Kiran Mane) यांनी केली आहे.
दरम्यान अभिनेता किरण माने हे अनेक कारणाने चर्चेत असतात. त्यांच्या फेसबुक पोस्ट नेहमी चर्चेत असतात. आताही त्यांनी अभिनेत्री छाया कदम यांच्याविषयी अभिनंदन करत फेसबुक पोस्ट लिहिली होती. सध्या ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
News Title – Kiran Mane Facebook Post About Chaya Kadam
महत्त्वाच्या बातम्या
जून महिन्यात ‘हे’ नियम बदलणार; तुमच्या खिशावर होणार परिणाम
तापमान गेलं चाळीशी पार; शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ‘हे’ उपाय करा
कोटींच्या संपत्तीचा मालक आहे हार्दिक पांड्या; घटस्फोटानंतर नताशाला..
“गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद..”; ठाकरे गटाचा खळबळजनक दावा
हृदयद्रावक! गेमझोनमध्ये लागलेल्या आगीत 32 जणांचा होरपळून मृत्यू; अंगावर शहारे आणणारे PHOTO समोर






