देशातील प्रथम महिला IPS अधिकारी किरण बेदी यांच्या बायोपिकची घोषणा!

On: June 12, 2024 2:28 PM
Kiran Bedi Biopic
---Advertisement---

Kiran Bedi Biopic | देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या जीवनावर आधारित ‘बेदी’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. कुशाल चावला या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

देशातील पहिल्या महिला IPS किरण बेदी यांचं नाव देशभरात आदराने घेतलं जातं. अनेक तरुणींच्या प्रेरणास्थानी किरण बेदी आहेत. किरण बेदी त्यांच्या बॅचमधील 80 पुरुष पोलिस अधिकाऱ्यांमध्ये फक्त एकट्या महिला आयपीएस अधिकारी होत्या.

पहिल्या महिला IPS किरण बेदी यांचा बायोपिक

हुंडा प्रथेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. शौर्य, निर्भयता, प्रेम, सत्य, सामर्थ्य अशा गोष्टींची तळमळ असलेल्या देशाच्या पहिल्या IPS महिला अधिकारी किरण बेदी यांचं आयुष्य आता मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे.

11 जूनरोजी निर्मात्यांनी या बायोपिकची घोषणा (Kiran Bedi Biopic ) करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. किरण बेदी यांच्या बायोपिकचं नाव हे ‘बेदी’ असणार आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.

2025 मध्ये चित्रपट रिलीज होणार

सिनेमाच्या कास्टबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचं पहिलं पोस्टर देखील रिलीज करण्यात आलं आहे. आयपीएस (Kiran Bedi Biopic ) म्हणून 35 वर्ष देशाची सेवा केल्यानंतर 2007 मध्ये किरण बेदी निवृत्त झाल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kushaal Chawla (@kushaalchawla)

किरण बेदी यांनी आयपीएस म्हणून दिल्ली शिवाय गोवा, चंदीगड आणि मिझोराम येथे सेवा दिली. तिहार तुरुंगाला मॉडेल जेल बनवण्यात त्यांनी योगदान दिलं आहे. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आता रुपेरी पडद्यावर दिसून येणार आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाचीच चर्चा रंगत आहे.

News Title – Kiran Bedi Biopic

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत धुसपुस?; ‘या’ दोन नेत्यांमध्ये रंगला कलगीतुरा

‘ते’ अजितदादांच्या बंगल्यावरचे ऑपरेटर आहेत काय?; बजरंग सोनवणेंनी सुनावलं

मोठी बातमी : ‘या’ जिल्ह्यातील शाळेला मनोज जरांगेंच नाव देण्यात येणार

शिंदे-पवारांचा फायदा नाही, विधानसभेला भाजप स्वबळावर लढणार?

बायको, मुलगा की अन्य; अजितदादा राज्यसभेवर कोणाला पाठवणार?

Join WhatsApp Group

Join Now