मोठी बातमी! खोक्या भाई उर्फ सतीश भोसलेचा आणखी एक प्रताप समोर

On: March 13, 2025 1:42 PM
Khokya Bhosale
---Advertisement---

Satish Bhosale | सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथून अटक करण्यात आली आहे. त्याचे अनेक गुन्हेगारी कारनामे समोर आले आहेत. (Satish Bhosale)

एका व्यक्तीला मारहाण करतानाचा आणि पैसे उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर, त्याच्या उत्पन्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्याने खोटी जात दाखवून भाजपकडून (BJP) पद मिळवल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.

घरात सापडले शिकारीचे साहित्य

काही दिवसांपूर्वी पोलीस आणि वनविभागाने (Forest Department) सतीश भोसलेच्या घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरात जनावरांचे सुकलेले मांस आणि शिकारीचे साहित्य आढळून आले. त्याने 200 पेक्षा अधिक हरणांची शिकार (Deer Hunting) केल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. तसेच, हरणाची शिकार करण्यास विरोध करणाऱ्या ढाकणे कुटुंबातील दोघांना त्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

वनविभागाकडून दोन गुन्हे दाखल

वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत (Wildlife Protection Act) गुन्हा: 8 मार्च रोजी वाळलेले जनावरांचे मांस आणि शिकारीचे साहित्य सापडल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला.

वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून घर बांधल्याप्रकरणी गुन्हा: या प्रकरणात त्याला नोटीस देण्यात आली असून, सात दिवसांच्या आत मालकी हक्क सिद्ध न केल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे. (Satish Bhosale)

Title : Khokya Bhai aka Satish Bhosale Crimes 

 

Join WhatsApp Group

Join Now