मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘या’ ३ राशींच नशीब पालटणार! नशिबाची साथ मिळणार

On: March 21, 2026 6:50 PM
Ketu Transit 2026
---Advertisement---

Ketu Transit 2026 | ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालींचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो असे मानले जाते. विशेषतः छाया ग्रह मानले जाणारे केतू आणि राहू हे नेहमी वक्री गतीने भ्रमण करत असल्याने त्यांच्या बदलांना विशेष महत्त्व दिले जाते. आता मार्च महिन्याच्या शेवटी केतूच्या नक्षत्रात होणारा बदल काही राशींसाठी अत्यंत शुभ मानला जात आहे. (Zodiac Predictions 2026)

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार 29 मार्च 2026 रोजी केतू स्वतःच्या मालकीच्या माघ नक्षत्र मध्ये प्रवेश करणार आहे. जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा त्याची शक्ती वाढते आणि त्या ग्रहाचे सकारात्मक परिणाम अधिक प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ प्रगती, पैसा आणि यश घेऊन येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मेष राशीसाठी करिअरमध्ये मोठी संधी :

मेष राशीच्या व्यक्तींना केतूच्या या बदलाचा मोठा फायदा मिळू शकतो. गेल्या काही काळापासून करिअरमध्ये येणारे अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात तसेच पदोन्नतीचेही संकेत मिळत आहेत. (Ketu Transit 2026)

सरकारी कामे किंवा अडकलेली कागदपत्रे पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि करिअरमध्ये प्रगतीची नवी दारे उघडू शकतात.

Ketu Transit 2026 | सिंह राशीसाठी आर्थिक प्रगती :

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल मानला जात आहे. केतूचा नक्षत्र बदल या राशीत होत असल्याने समाजात प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.

याशिवाय पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून अनपेक्षित लाभ मिळू शकतो. व्यवसायानिमित्त होणारे परदेश प्रवास फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे.

धनु राशीला नशिबाची साथ :

धनु राशीच्या लोकांसाठीही हा काळ लाभदायी ठरू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ मानली जात आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. (Ketu Transit 2026)

याशिवाय आध्यात्मिक गोष्टींकडे आकर्षण वाढू शकते. त्यामुळे मानसिक शांती आणि समाधान मिळण्याची शक्यता आहे. एकूणच केतूचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींसाठी प्रगती आणि सकारात्मक बदलांचे संकेत देत आहे.

News Title: Ketu Nakshatra Transit 2026: These 3 Zodiac Signs May Get Major Success And Financial Gains

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now