चेतनच्या पँटमध्ये नेमकं काय दडलंय? पोलिसांकडून ‘त्या’ मोठ्या पुराव्याचा शोध सुरू

On: June 29, 2026 7:23 PM
Chetan Choudhari
---Advertisement---

Chetan Chaudhary | पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे नवे दावे आणि खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीसंदर्भात न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी चेतनच्या वकिलांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत अनेक मुद्द्यांवर आक्षेप नोंदवले.

चेतनच्या वकिलांनी पोलिसांच्या मागणीवर उपस्थित केले प्रश्न :

या प्रकरणात पुढील तपासासाठी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी तपास यंत्रणांनी न्यायालयात केली. मात्र चेतन चौधरीच्या वतीने अॅड. राम सहाणे यांनी याला विरोध करत पोलिसांकडे सात दिवसांचा कालावधी उपलब्ध असतानाही आवश्यक तपास पूर्ण का करण्यात आला नाही, असा सवाल उपस्थित केला. त्यांच्या मते, प्रथमदर्शनी कटाचा आरोप केला जात असला तरी एफआयआरमध्ये चेतनचा उल्लेख केवळ दोन ठिकाणी आहे.

वकिलांनी पुढे सांगितले की, घटनास्थळाचा पंचनामा, जप्तीची प्रक्रिया आणि आरोपींची समोरासमोर चौकशी करण्यासाठी आधीच सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. लोहगडावर सियाकडून घटनाक्रमाचे रीक्रिएशन करण्यात आले असून आता चेतनलाही घटनास्थळी नेण्याची गरज असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र जर तपासासाठी त्याची पँट जप्त करणे आवश्यक होते, तर त्याच वेळी हुडी, मोबाईल आणि वाहन जप्त करताना ती का घेतली नाही, असा प्रश्नही त्यांनी न्यायालयात उपस्थित केला.

Chetan Chaudhary | कस्टडी वाढवण्यास बचाव पक्षाचा विरोध :

चेतनच्या वकिलांनी युक्तिवाद करत सांगितले की, मोबाईल फोन सिया गोयलकडे होता, त्यामुळे त्या संदर्भातील तपासासाठी चेतनची पोलीस कोठडी वाढवण्याची गरज काय, हे स्पष्ट होत नाही. आरोपींनी कथितरित्या घटनास्थळी जाऊन हत्येचा सराव केल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. मात्र जर तसे असेल, तर सात दिवसांच्या आधीच्या कोठडीत त्याची पडताळणी का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बचाव पक्षाने पुढे सांगितले की, तपासात सहकार्य म्हणून चेतनचे वाहन पोलिसांना स्वेच्छेने उपलब्ध करून देण्यात आले होते. जर तपासासाठी त्याची पँटही आवश्यक होती, तर ती देखील मागितल्यास देण्यात आली असती. तपासाशी संबंधित अनेक गोष्टी माध्यमांमधूनच समजत असल्याचा दावा करत, चेतन चौधरीला आणखी पोलीस कोठडी देऊ नये, अशी मागणी त्याच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली.

News Title: Ketan Murder Case: Defence Questions Police Custody

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now