Ketan Agarwal | पुण्यातील (Pune) केतन अग्रवाल (Ketan Agarwal) हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान एक नवीन व्हिडीओ समोर आल्याने या प्रकरणाची पुन्हा चर्चा रंगली आहे. हा व्हिडीओ एका कौटुंबिक समारंभातील असून त्यात केतन आनंदी वातावरणात नृत्य करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात अग्रवाल आणि गोयल कुटुंबीय एकत्र उपस्थित असल्याचेही स्पष्टपणे दिसून येत आहे.
7 मेच्या कार्यक्रमातील व्हिडीओने वेधले लक्ष :
समोर आलेला व्हिडीओ 7 मे रोजी झालेल्या एका कौटुंबिक कार्यक्रमाचा असल्याची माहिती गायिका रितू शर्मा (Ritu Sharma) यांनी दिली आहे. या कार्यक्रमात त्यांनी गायन सादर केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी अग्रवाल आणि गोयल कुटुंबीयांमध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव किंवा वाद असल्याचे जाणवले नव्हते. उलट सर्वजण एकत्र आनंदाने कार्यक्रमाचा आस्वाद घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
The video from May 7th shows Ketan & Siya’s families celebrating life to its fullest, dancing to classic tunes
It is a haunting reminder of how fast everything can changepic.twitter.com/zIqA2wpT6z
— SaffronSoul (@TheRealDharm) June 30, 2026
रितू शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कार्यक्रम केतनच्या चुलत भावाच्या लग्नाआधी आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी नवरीच्या मामाच्या भूमिकेत असलेले केतनचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) आपल्या बहिणीला भेटवस्तू देत होते. याच कार्यक्रमासाठी त्यांना गायन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. केतन आपल्या कुटुंबासह आत्याच्या घरी पाहुणा म्हणून उपस्थित होता. सिया गोयल (Siya Goyal) या कार्यक्रमात नसली तरी तिचे आई-वडील प्रवीण गोयल (Praveen Goyal) आणि पूजा गोयल (Pooja Goyal) उपस्थित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Ketan Agarwal | व्हायरल व्हिडीओत दोन्ही कुटुंबांचा आनंदी सहभाग :
रितू शर्मा यांनी मंगळवारी रात्री त्यांच्या इन्स्टाग्राम (Instagram) खात्यावर दोन व्हिडीओ शेअर केले. पहिल्या व्हिडीओमध्ये केतनचे वडील, तसेच सियाचे आई-वडील आणि इतर नातेवाईक एकत्र उभे असल्याचे दिसते. कार्यक्रमातील वातावरण उत्साहपूर्ण असून सर्वजण आनंदाने सहभागी झाल्याचे या दृश्यांतून स्पष्ट होते.
दुसऱ्या व्हिडीओमध्ये विशाल अग्रवाल गायिकेसोबत बॉलिवूडमधील लोकप्रिय ‘यम्मा यम्मा’ हे गाणे गाताना दिसत आहेत. त्याचवेळी उपस्थित सर्वजण “बस आज की रात है जिंदगी, कल हम कहाँ तुम कहाँ” या गाण्यावर ठेका धरून नृत्य करताना दिसत आहेत. रितू शर्मा यांनी सांगितले की, हा त्यांच्या या कुटुंबासाठीचा तिसरा कार्यक्रम होता. केतन प्रत्येक कार्यक्रमात सक्रियपणे सहभागी व्हायचा, सर्वांशी मनमोकळेपणाने वागायचा आणि त्याने स्वतःही त्यांच्याकडे गाण्याची विनंती केली होती. दरम्यान, हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून केतन हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.






