हृदयद्रावक! मृत नर्सेबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, केरळच्या अधिकाऱ्याला दणका

On: June 13, 2025 5:34 PM
Ahmedabad Plane Crash Nurse
---Advertisement---

Ahmedabad Plane Crash Nurse | अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातात 250 हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात लंडनला नोकरीनिमित्त प्रवास करणाऱ्या केरळमधील नर्स रंजिता यांचाही समावेश होता. रंजिता यांचा मृत्यू होताच, सोशल मीडियावर एका सरकारी अधिकाऱ्याने त्यांच्या बद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली, ज्यामुळे संतापाची लाट उसळली. (Ahmedabad Plane Crash Nurse)

कासरगोड जिल्ह्यातील वेल्लारीकुंडू तालुका कार्यालयात कार्यरत कनिष्ठ अधीक्षक ए. पवित्रन यांनी फेसबुकवर रंजिता यांची खिल्ली उडवणारी पोस्ट केली. ही पोस्ट इतकी असंवेदनशील आणि अवमानजनक होती की, राज्याचे महसूल मंत्री के. राजन यांनी स्वतः याची दखल घेत पवित्रन यांना तत्काळ निलंबित केले.

मृत नर्स रंजिता – आई, सेविका आणि संघर्षशील महिला :

रंजिता या पठाणमथिट्टा जिल्ह्यातील पुल्लाड येथील रहिवासी होत्या आणि दोन मुलांची आई होत्या. त्या काही काळ ब्रिटनमध्ये नर्स म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर त्या केरळमध्ये परत येऊन पुन्हा सरकारी सेवेत रुजू होण्याच्या प्रक्रियेत होत्या. मात्र, त्या लंडनला परत जात असतानाच या दुर्दैवी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज (Vina Jorj) यांनी रंजिता यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. नातेवाईक आणि नागरिक भावुक झाले कारण ही केवळ एक व्यक्ती नाही, तर एका संपूर्ण कुटुंबाचा आधार हरवला होता.

Ahmedabad Plane Crash Nurse | गुरुवारी झाला भीषण अपघात :

गुरुवार, 12 जून रोजी दुपारी अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या एअर इंडियाच्या (Air India) विमानाचा टेकऑफनंतर काही मिनिटांतच बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात भीषण अपघात झाला. या विमानात दोन पायलट, 10 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवासी होते. या दुर्घटनेत 241 जणांचा मृत्यू झाला असून, केवळ एक प्रवासी जिवंत बचावला आहे. (Ahmedabad Plane Crash Nurse)

या पार्श्वभूमीवर, अशा भीषण घटनेनंतरही सरकारी पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून अशा प्रकारची असंवेदनशील वर्तवणूक होणे अत्यंत खेदजनक आहे. रंजिता यांच्यासारख्या सेवाभावी महिलेला समाजातील अशा वागणुकीला सामोरे जावे लागणे, हेच आपल्यासाठी आत्मचिंतनाचे कारण ठरावे.

News Title: Kerala Officer Suspended for Offensive Facebook Post on Nurse Killed in Ahmedabad Plane Crash

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now