‘या’ 18 वर्षीय अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू; वडिलांनी दिली माहिती

On: July 22, 2026 2:42 PM
Kaylee Hottle Dies
---Advertisement---

Kaylee Hottle Dies | हॉलिवूड चित्रपटसृष्टीतून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ‘गॉडझिला वर्सेस काँग’ (Godzilla vs. Kong) आणि ‘गॉडझिला एक्स काँग: द न्यू एम्पायर’ (Godzilla x Kong: The New Empire) या चित्रपटांमधून ओळख मिळवलेल्या 18 वर्षीय अभिनेत्री केली हॉटल (Kaylee Hottle) यांचे रस्ते अपघातात निधन झाले. कार पुलाला धडकल्यानंतर त्या गंभीर जखमी झाल्या, तर कार चालवणाऱ्या तरुणाला केवळ किरकोळ दुखापत झाली.

पहाटे झालेल्या अपघातात अभिनेत्रीचा मृत्यू :

मंगळवारी पहाटे अमेरिकेतील (United States) मेरिलँड (Maryland) राज्यातील इजॅम्सविल (Ijamsville) परिसरात हा अपघात घडला. फ्रेडरिक काउंटी शेरिफ कार्यालय यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास होंडा अकॉर्ड (Honda Accord) कार नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्यावरून खाली उतरली आणि पुलाला धडकली. त्या वेळी कारमध्ये एकूण तीन जण प्रवास करत होते. प्राथमिक तपासात वाहनाचा अतिवेग हा अपघातामागील मुख्य कारण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अपघातानंतर तातडीने आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आणि केली हॉटल यांना रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले, परंतु त्यात यश आले नाही. कार चालवणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला केवळ किरकोळ दुखापत झाली असून इतर एका प्रवाशाचीही माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

Kaylee Hottle Dies | वडिलांची भावनिक प्रतिक्रिया, कलाकारांकडून श्रद्धांजली :

केली हॉटल यांचे वडील जोशुआ हॉटल (Joshua Hottle) यांनी अमेरिकन साइन लँग्वेज (American Sign Language) च्या माध्यमातून फेसबुक लाईव्हवर मुलीच्या निधनाची माहिती दिली. स्वतः बहिरे असलेल्या जोशुआ यांनी, “मुलीसोबत घालवलेली 18 वर्षे आमच्यासाठी अमूल्य होती. तिच्यासोबत आणखी काही काळ घालवता आला असता, अशी इच्छा कायम राहील,” अशा भावना व्यक्त केल्या. ते टेक्सास (Texas) येथून मेरिलँडकडे मुलीचे पार्थिव आणण्यासाठी रवाना झाल्याचेही त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, अपघातावेळी कार चालवणाऱ्या तरुणाला त्यांनी माफ करत, “या एका घटनेमुळे तुझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ देऊ नकोस,” असा भावनिक संदेश दिला. केली यांच्या आईनेही मुलगी अजूनही आपल्या सोबत असल्यासारखे वाटत असल्याची भावना व्यक्त केली.

News Title: Kaylee Hottle Dies in Crash

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now