काव्या मारन बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध गायकासोबत अडकणार विवाहबंधनात?

On: June 30, 2026 12:41 PM
Kavya Maran
---Advertisement---

Kavya Maran | आयपीएलमधील (Indian Premier League) सनरायझर्स हैदराबाद संघाची (Sunrisers Hyderabad) मालकीण काव्या मारन (Kavya Maran) लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रन (Anirudh Ravichander) यांच्यासोबत तिच्या विवाहाच्या चर्चा रंगल्या असून या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

मुलाखतीतील वक्तव्यानंतर रंगल्या चर्चा :

या चर्चांना सुरुवात झाली ती अभिनेते वाय. जी. महेंद्र (Y. G. Mahendran) यांच्या एका मुलाखतीनंतर. अनिरुद्ध यांच्या लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी अनिरुद्ध आणि काव्या यांच्या विवाहाची शक्यता जवळपास निश्चित असल्याचे म्हटले. तसेच अनिरुद्ध एका प्रतिष्ठित आणि मोठ्या कुटुंबाचा भाग होणार असल्याचे सांगत त्यांनी त्याचे अभिनंदनही केले.

यानंतर काव्या मारनबाबत बोलताना त्यांनी तिच्या नेतृत्वगुणांचेही कौतुक केले. एवढ्या मोठ्या आयपीएल संघाचे व्यवस्थापन करण्याची क्षमता तिच्यामध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच तिच्या वडिलांकडून तिला व्यावसायिक कौशल्यांचा वारसा लाभल्याचे सांगत काव्या आणि अनिरुद्ध यांची जोडी उत्तम असल्याचे मत व्यक्त केले. दोघांनी भविष्यात संगीत क्षेत्रातही एकत्र काम करण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सूचित केले.

Kavya Maran | अधिकृत घोषणा अद्याप नाही :

काव्या आणि अनिरुद्ध यांच्या लग्नाबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. विवाह कधी आणि कुठे होणार याविषयी कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नसल्याने या चर्चांवर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. त्यामुळे दोघांकडून अधिकृत घोषणा कधी होते, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वीही काव्या मारन आणि अनिरुद्ध एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा समोर आल्या होत्या. मात्र त्या वेळीही दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. लग्नाच्या चर्चांवरही दोन्ही बाजूंनी मौन बाळगण्यात आले आहे.

News Title: Kavya Maran Wedding Rumours Explained

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now