IPL आधी काव्या मारनला मोठा धक्का! एकामागून एक स्टार खेळाडूंची माघार; नेमकं कारण काय?

On: March 20, 2026 2:45 PM
IPL 2026
---Advertisement---

IPL 2026 | आगामी Indian Premier League 2026 सुरू होण्यापूर्वीच अनेक संघांना मोठे धक्के बसत आहेत. दुखापतीमुळे काही महत्त्वाचे खेळाडू स्पर्धेबाहेर जात असल्याने संघांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, काव्या मारन यांच्या सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघालाही मोठा फटका बसला आहे.

सनरायझर्स हैदराबादचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू जॅक एडवर्ड्स (Jack Edwards) दुखापतीमुळे आयपीएल 2026 मधून बाहेर पडला आहे. त्यामुळे संघाच्या संयोजनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जॅक एडवर्ड्स दुखापतीमुळे बाहेर :

Jack Edwards याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 77 टी-20 सामने खेळले आहेत. फलंदाजीत त्याने 121.50 च्या स्ट्राइक रेटने 853 धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीत 8.32 च्या इकॉनॉमी रेटने 52 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळेच हैदराबादने आयपीएल लिलावात त्याला तब्बल 3 कोटी रुपयांना संघात घेतले होते.

मात्र दुखापतीमुळे तो संपूर्ण हंगाम खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संघाला पुन्हा पर्यायी खेळाडू शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.

कर्णधारही दुखापतीने त्रस्त :

दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार Pat Cummins देखील सध्या पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. त्यामुळे तो आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. या परिस्थितीत संघाची जबाबदारी तात्पुरती ईशान किशन याच्याकडे सोपवण्यात आली आहे.

संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की, कर्णधार कमिन्स पूर्णपणे फिट होईपर्यंत इशान किशन संघाचे नेतृत्व करेल. तर अभिषेक शर्मा याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, इतर संघांनाही आयपीएलपूर्वी धक्के बसले आहेत. Nathan Ellis आणि Sam Curran हे दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाले आहेत. तर Lockie Ferguson कुटुंबातील कारणामुळे आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही.

News Title: Kavya Maran Faces Trouble Before IPL 2026: Sunrisers Hyderabad Player Jack Edwards Ruled Out Due to Injury

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now