करुणा मुंडे करणार हनी ट्रॅपचा पर्दाफाश?, पीडितेच्या आरोपांनंतर मोठा खुलासा!

On: July 22, 2025 10:57 AM
Honeytrap Case
---Advertisement---

Honeytrap Case | राज्यात वादग्रस्त ठरलेल्या हनी ट्रॅप (Honeytrap Case) प्रकरणात आता एक नवं आणि धक्कादायक वळण आलं आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये या प्रकरणावरून आधीच शाब्दिक युद्ध रंगलेलं असतानाच आता स्वराज्य पक्षाच्या नेत्या करुणा मुंडे यांनी एका पीडित महिलेच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या खुलाशांमुळे पोलिस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना मोठ्या अडचणीत टाकणारा नवा वाद पेटला आहे.

ACP अधिकाऱ्यावर गंभीर आरोप; पाण्यात गुंगीचे औषध टाकून अत्याचार? :

पत्रकार परिषदेत पीडित महिलेने थेट एका ACP दर्जाच्या अधिकाऱ्याचे नाव घेत गंभीर आरोप केले. तिच्या मते, संबंधित अधिकाऱ्याने सुरुवातीला मोबाईल नंबर मागून मेसेजिंग सुरू केलं, नंतर पोलीस ठाण्यात “चहा प्यायला” बोलावलं. पुढे त्या अधिकाऱ्याच्या बायकोच्या उपस्थितीचा बहाणा करून घरी बोलावण्यात आलं, मात्र घरात बायको नसून त्याने पाण्यात गुंगीचं औषध टाकलं आणि बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर अत्याचार केला. (Honeytrap Case)

महिलेने दावा केला की, “या अधिकाऱ्याने आणि आणखी एका व्यक्तीने माझ्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला”. यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता कोणीही तक्रार घेतली नाही, आणि तिला उलट धमक्या देण्यात आल्या, असा गंभीर आरोप तिने केला.

Honeytrap Case | “तक्रार दिली पण पोलिसांनी मलाच खोट्या प्रकरणात अडकवलं” :

पीडितेने पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला आयोग यांच्याकडे तक्रारी केल्या असूनही न्याय मिळालेला नाही, असं स्पष्ट केलं. इतकंच नाही तर “पुराव्यांसह पेन ड्राईव्हमध्ये सर्व व्हिडीओ-ऑडिओ रेकॉर्ड आहेत”, असा दावा करत तिने संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध खंडणी आणि विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल झाल्याची तक्रार केली आहे.

करुणा मुंडे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे याप्रकरणी वेळ मागितली असून, त्या म्हणाल्या की, “महिलांवर अन्याय होतो आणि त्यांना न्याय देणारे कोण नाहीत. पोलिसांच्या हातातही राजकीय दडपण आहे.”

त्यांनी सांगितले की, “जर ८ दिवसांत गुन्हा दाखल झाला नाही, तर मी थेट डीसीपी कार्यालयासमोर आंदोलन करणार.”

त्याचप्रमाणे “हनी ट्रॅपमध्ये अनेक आमदार, खासदार आणि अधिकारी अडकले आहेत. हे प्रकरण मनासारखं चालत नसलं की ते महिलांना बदनाम करत ‘हनी ट्रॅप’ ठरवत आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

News Title: Karuna Munde’s Explosive Revelation in Honeytrap Case – Victim Alleges Rape by ACP with Proof in Pendrive

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now