कार्तिकी गायकवाडच्या घरी आला नवा गोंडस पाहुणा; कार्तिकी रोनित झाले आई-बाबा

On: May 14, 2024 7:25 PM
Kartiki Gaikwad
---Advertisement---

Kartiki Gaikwad | गायिका कार्तिकी गायकवाडला (Kartiki Gaikwad) कोण ओळखत नाही असं नाही. लिटिल चॅम्प कार्तिकी गायकवाडसाठी (Kartiki Gaikwad) आणि तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कार्तिकीने (Kartiki Gaikwad) गोंडस बाळाला जन्म दिला आहे. कार्तिकीचा पती रोनित पिसे या दोघांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे आणि त्यांनी याबाबत आनंदाची बातमी दिली आहे.

कार्तिकी रोनित झाले आई-बाबा

शास्त्रीय संगीतासाठी कार्तिकी गायकवाडची (Kartiki Gaikwad) ओळख आहे. तिने लिटिल चॅम्प या कार्यक्रमात भाग घेऊन स्पर्धेच्या अंतिम टप्प्यापर्यंत झुंज दिली होती. यावेळी कार्तिकी गायकवाडचं घागर घेऊन घागर घेऊन… हे गाणं त्यावेळी मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. त्या गाण्याची आजही क्रेझ आहे. मात्र आता कार्तिकी गायकवडने नुकताच बाळाला जन्म दिल्याने ती चर्चेत आली.

शुभेच्छांचा वर्षाव

कार्तिकीचा पती रोनित पिसे हा पुणे येथील स्थित व्यवसायिक आहे. दोघांचा संसार हा सध्या सुखाचा सुरू आहे. या संसारामध्ये संसार अधिक रंगवण्यासाठी एका चिमुकल्याचं आगमन झालं आहे. यामुळे आता कार्तिकी आणि रोनित पिसे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. याबाबत दोघांनी सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना माहिती दिलीये.

2020 मध्ये रोनित पिसे आणि कार्तिकी गायकवाड यांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर आता म्हणजेच 2024 रोजी कार्तिकी आई झाली आहे. या बातमीने संगीत विश्वात आनंदाची झुळूक पाहायला मिळत आहे. अनेकजण शुभेच्छा देताना दिसत आहेत. दोन महिन्यांआधी डोहाळ जेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

आता कार्तिकीच्या इवल्याश्या गोंडस बाळाला कधी पाहता येईल याकडे कार्तिकीच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. यामध्ये कार्तिकीने आपल्या लहान बाळाचे बोट धरल्याचं पाहायला मिळत आहे.

News Title – Kartiki Gaikwad Baby Born News

महत्त्वाच्या बातम्या

‘या’ भागांमध्ये पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा अंदाज

भर कार्यक्रमात जया बच्चन असं काही बोलल्या, ऐश्वर्या रायला थेट रडूच कोसळलं, Video होतोय Viral

ॲम्बुलन्स आणि पाण्याच्या टँकरमधूनही पैशांचं वाटप?; रोहित पवारांच्या दाव्यामुळे राज्यभर खळबळ

‘भिडू’ शब्द वापरायचा असेल तर माझी परवानगी घ्या!, जग्गू दादा कारवाईच्या तयारीत

सैफ अली खान तिसरी बायको आणण्याच्या तयारीत!, करिना कपूरसोबत संबंध बिघडले?

Join WhatsApp Group

Join Now