‘कामाचे तास ८ तासांपेक्षा… ‘; न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

On: February 28, 2025 1:36 PM
Karnataka HC says Sleeping on Duty Not Always Misconduct
---Advertisement---

Karnataka HC | बंगळूरुमध्ये (Bengaluru) एका पोलिस (Police) कॉन्स्टेबलला (Constable) कामावर झोप लागल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. या निर्णयाविरुद्ध कर्मचाऱ्याने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने, कामाच्या ठिकाणी झोप लागणे हा गुन्हा नाही, असा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. तसेच, घटने दरम्यान कर्मचाऱ्यावर कामाचा ताण असल्याचे निरीक्षण नोंदवले. (Karnataka HC)

कॉन्स्टेबल चंद्रशेखर यांचे निलंबन

कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (केकेआरटीसी – KKRTC) कॉन्स्टेबल चंद्रशेखर यांना १ जुलै २०२४ रोजी ड्युटीवर असताना झोपल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. कामाच्या वेळी डुलकी घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती.

याचिकाकर्त्याच्या निलंबनाची शिफारस करणाऱ्या महामंडळाच्या दक्षता विभागानेही, आगारात केवळ तीन हवालदार असून, सध्याच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा भार खूप जास्त असल्याचा अहवाल सादर केला होता.

न्यायालयाचा निकाल

यावर सुनावणी करताना, न्यायाधीशांनी संविधानानुसार लोकांना झोपण्याचा, आराम करण्याचा अधिकार आहे, यावर भर दिला. ते म्हणाले, “जर याचिकाकर्त्याची ड्यूटी एका शिफ्टपुरती मर्यादित असेल आणि तो ड्यूटीवर असताना झोपला तर ती निःसंशयपणे गैरवर्तणूक होईल. परंतु खटल्यातील काही तथ्ये वेगळी आहेत.”

न्यायालयाने, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या करारानुसार कामाचे तास आठवड्यातून ४८ तास व दिवसाचे ८ तासांपेक्षा जास्त नसावेत, असे स्पष्ट केले. तसेच, सदर प्रकरणात, महामंडळाने चंद्रशेखर यांना हवालदार कर्मचारी कमी असल्याने ६० दिवस विश्रांतीशिवाय दिवसाचे १६ तास काम करण्यास भाग पाडले, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. (Karnataka HC)

Title : Karnataka HC says Sleeping on Duty Not Always Misconduct

 

Join WhatsApp Group

Join Now