“माझ्यावर प्राईस टॅग लावून, मला झोपायला…”, करिश्मा कपूरने केला सर्वात मोठा खुलासा

On: May 14, 2024 1:21 PM
Karishma Kapoor big revelation about her married life
---Advertisement---

Karishma Kapoor | बॉलीवुड अभिनेत्री करिश्मा कपूर बऱ्याच दिवसांपासून सिनेसृष्टीमध्ये सक्रिय नाही. 90 च्या दशकात तिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ केलंय. आजही तिचा चाहता वर्ग टिकून आहे.तिच्या अभिनयाचे जितके चाहते आहेत तितकेच तिच्या सौंदर्याचेही चाहते आहेत.

अशात करिश्माने केलेल्या एका खुलाश्यामुळे सध्या तिची जोरदार चर्चा रंगली आहे. करिश्माने तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केलाय. प्रोफेशनल आयुष्यात करिश्माने यशाचे शिखर गाठले असले तरी व्यक्तिगत आयुष्यात तिने अनेक अडचणींचा सामना केला आहे. तिच्या वैवाहिक आयुष्यात खूप अडचणी आल्या आहेत. इतकंच नव्हे तर, अगदी लग्नानंतर पहिल्या दिवशी म्हणजेच हनीमूनच्याच दिवशी तिच्या नवऱ्याने असं काही केलं, जे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला.

करिश्मा कपूरचा धक्कादायक खुलासा

स्वतः करिश्माने याचा खुलासा केला आहे. करिश्माने (Karishma Kapoor) 2003 मध्ये संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली. पण लग्नाच्या 11 वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2014 मध्ये या जोडप्याने घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान दोघांनीही एकमेकांवर अनेक आरोप केले होते.

एका मीडिया रिपोर्टनुसार, करिश्माने तिच्या हनीमूनचा एक प्रसंग सांगितला आहे. ‘हनीमूनच्या दिवशी संजयने मला त्याच्या एका मित्रासोबत झोपायला लावलं. मी नकार दिल्यानंतर त्याने मला मारहाण केली. त्यानंतर त्याने माझ्यावर प्राईस टॅग लावून एका मित्रासमोर माझा लिलाव केला.’, असा धक्कादायक खुलासा करिश्माने केला आहे.

गरोदरपणात करिश्माला मारहाण करण्यात आली?

इतकंच नाही तर, ‘ माझ्या गरोदरपणात माझ्या सासूबाईंनी एक ड्रेस माझ्यासाठी आणला होता, पण तो मला नीट बसला नाही. तेव्हा संजयने माझ्या सासूबाईंना मला मारायला सांगितलं.’,असंही करिश्मा म्हणाली आहे.

मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या या खुलाश्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. करिश्माचा (Karishma Kapoor)घटस्फोट होऊन आता बरीच वर्षे लोटली आहेत. पण तिने केलेल्या या खुलाश्यामुळे पुन्हा एकदा तिचं आणि संजयचं नातं चर्चेत आलं आहे.

News Title : Karishma Kapoor big revelation about her married life

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबईत पावसाचा धुमाकूळ, आता पुण्याची बारी..?; हवामान विभागाचा मोठा इशारा

अजितदादा पुढचे CM होणार? फडणवीसांनी नेमकं काय उत्तर दिलं

‘ईडीच्या भीतीने घाबरलेले राज ठाकरे..’; किरण माने थेट बोलले

‘इथं लोकांचा जीव गेलाय यांचं भलतंच’; होर्डिंग दुर्घटनास्थळी भाजप नेत्याचं भांडण

नागरिकांची ‘त्या’ त्रासापासून होणार कायमची सुटका; सरकारने घेतला मोठा निर्णय

Join WhatsApp Group

Join Now