‘त्या’ चित्रपटातील इंटिमेंट सीनबद्दल करिनाने सगळं सांगितलं, म्हणाली “सगळ्या मर्यादा पार…”

On: May 16, 2025 4:15 PM
Kareena Kapoor
---Advertisement---

Kareena Kapoor | करीना कपूर (Kareena Kapoor) ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असून तिने आपल्या कारकिर्दीत अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. मात्र, 2009 मध्ये आलेल्या ‘कुर्बान’ (Kurbaan) या चित्रपटातील तिच्या बोल्ड आणि इंटिमेट सीनमुळे प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनला होता.

‘कुर्बान’मधील दृश्यांमुळे झाली होती चर्चा-

करण जोहर (Karan Johar) निर्मित या चित्रपटात करीना कपूर आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) प्रमुख भूमिकेत होते. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री इतकी जबरदस्त होती की, त्यांचे इंटिमेट सीन लोकांच्या लक्षात राहिले. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीना आणि सैफ रिलेशनशिपमध्ये होते, पण त्यांनी अजून लग्न केले नव्हते.

या चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे प्रेक्षकांमध्ये आणि माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. काहींनी या दृश्यांची प्रशंसा केली तर काहींनी तीव्र टीकाही केली. करीना कपूरने (Kareena Kapoor) याबद्दल बोलताना सांगितले होते की, “ही माझी भूमिका होती आणि मी ती प्रामाणिकपणे साकारली.”

पूर्वी नाकारलेले सीन, पण ‘कुर्बान’मध्ये घेतला धाडसी निर्णय

एका मुलाखतीत करीना कपूरने स्पष्ट केले होते की, तिला इंटिमेट सीन करणे फारसे सोयीचे वाटत नाही. पण ‘कुर्बान’साठी तिने ही मर्यादा पार केली. या चित्रपटात सैफसोबत तिच्या बोल्ड सीन्सनी सिनेमाचा बोलबाला वाढवला.

तिच्या मते, अभिनय हे तिचं काम आहे आणि आवश्यकतेनुसार तिने हे सीन साकारले. याआधी काही चित्रपटांमधील अशा दृश्यांना तिने नकार दिला होता, पण ‘कुर्बान’मध्ये तिने आपली भूमिका समजून ती लीलया साकारली.

News Title – Kareena Kapoor on bold scene in kurban movie

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now