पोलिसांना शिवीगाळ करणं भाजप नेत्याला पडलं महागात, अखेर…

On: May 22, 2024 4:49 PM
Kapil Patil
---Advertisement---

Kapil Patil | भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून कपिल पाटील (Kapil Patil) यांना उमेदवारी देण्यात आली. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे यांच्यात लढत झाली. अशातच आता भाजपचे उमेदवार कपिल पाटील (Kapil Patil) हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांनी हद्द पार करत पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पोलिसांना शिवीगाळ करणं कपिल पाटील यांना भोवलं

लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रशासनाच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी तसेच पोलिसांना शिवीगाळ केल्याने कपिल पाटील (Kapil Patil) आता अडचणीत आले आहेत. पोलिसांना शिवीगाळ करणं हे प्रकरण त्यांना आता चांगलंच अगलंट येणार आहे. याप्रकरणी कपिल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घुगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून 186,504,506, कलमानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचे काम महायुतीचे उमेदवार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी केलं आहे. पोलिसांवर शिवीगाळ केल्याप्रकरणी आता ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कपिल पाटीलसह त्यांच्या साथीदारांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडीतील अन्सारी मैदान परिसरात मतदान पार पडलं. तिथं बोगस मतदान होत असल्याचा दावा कपिल पाटील यांनी केला होता. त्यावेळी अधिकारी आणि पोलीसांना कपिल पाटील (KapilPatil) यांनी शिवीगाळ केली. कपिल पाटील यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत

भिवंडी लोकसभा मतदारसंघात तिरंगी चुरस रंगत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून निलेश सांबरे, महायुतीकडून म्हणजेच भाजपचे उमेदवार विवेक पाटील यांनी निवडणूक लढवली आहे. आता यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्से गटाचे नेते बाळ्या मामा यांनी आव्हान निर्माण केलं आहे. याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

भिवंडीकर नेमका कौल कोणत्या उमेदावाराला देतात हे पाहणं गरजेचं आहे. हे येत्या 4 जूनला लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशी समोर येईल.

News Title – Vivek Patil Bad Words Use To Police News Update

महत्त्वाच्या बातम्या

महेंद्रसिंह धोनीने घेतला सर्वांत मोठा निर्णय; पोस्ट करत म्हणाला..

सध्या चर्चेत असलेल्या पोर्शे कारची किंमत आहे तरी किती? जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

सोन्याचा ग्राहकांना मोठा दिलासा; ‘इतक्या’ रुपयांनी भाव घसरले

रश्मी ठाकरेंबाबत बड्या नेत्याचा गौप्यस्फोट, म्हणाले…

“पुणे शहरात आता टू-व्हिलर चालवायला सुद्धा भीती वाटत आहे”

Join WhatsApp Group

Join Now