अबू सालेमसोबत कंगनाची पार्टी?; ‘त्या’ व्हायरल फोटोवर अभिनेत्रीनं दिलं स्पष्टीकरण

On: May 28, 2024 3:38 PM
Kangana Ranaut On Her Fake Photo With Abu Salem
---Advertisement---

Kangana Ranaut | बॉलीवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री कंगना रनौत आता राजकारणात ही उतरली आहे. यंदाच्या लोकसभेसाठी कंगनाला भाजपाने तिकीट दिलं आहे. कंगना हिमाचल प्रदेश मधील मंडी येथून लोकसभेसाठी उभी राहिली आहे.

1 जून रोजी शेवटच्या टप्प्यात 57 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये हिमाचल प्रदेशचा देखील समावेश आहे.  तर 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे. त्यापूर्वीच कंपनाच्या एका फोटोने सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घातलाय.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत असणारी कंगना आता या व्हायरल फोटोमुळे चर्चेत आलीय. एका सोशल मीडिया युझरने कंगनाचा अबू सालेम सोबतचा फोटो पोस्ट केलाय. हा फोटो आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोवर अभिनेत्री कंगनाने संतापजनक प्रतिक्रिया दिलीये. तसंच फोटो मागील सत्य सांगत कंगनाने स्पष्टीकरण देखील दिलं आहे.

कंगनाचा ‘तो’ फोटो तूफान व्हायरल

सोशल मीडियावर गुरवक्ष सिंह ठाकुर नावाच्या एका व्यक्तीने अभिनेत्रीचा फोटो पोस्ट केला आहे. कंगना हिचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘भक्तांची देशभक्त अबू सलेम याच्यासोबत देशभक्ती दाखवत आहे… तिचे देशाचा शत्रू अबू सलेमसोबत काही खास क्षण…’ असं लिहिलं आहे.

सध्या अभिनेत्रीचा (Kangana Ranaut) हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अशात कंगना हिने देखील या युझरला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘हताश काँग्रेस अधिकारी हा फोटो सर्वत्र व्हायरल करत आहे. मी गँगस्टर अबू सालेमसोबत पार्टी करत असल्याचे कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे माजी मनोरंजन संपादक असलेल्या पत्रकार मार्क मॅन्युएल यांनी लिहिलं आहे जे अत्यंत अपमानास्पद आहे.’ असं कंगना म्हणाली आहे.

Kangana Ranaut

कंगनाकडून स्पष्टीकरण

‘फोटोत दिसणार व्यक्ती अबू सालेम नाही… एका सिनेमाच्या प्रमोशन कार्यक्रमादरम्यानच्या पार्टीचा हा फोटो आहे.’ व्हायरल होत असलेल्या फोटोचा स्क्रिनशॉट शेअर करत कंगनाने या व्हायरल होणाऱ्या फोटोमागचं सत्य सांगितलं आहे. सध्या सर्वत्र कंगना (Kangana Ranaut) हिच्या व्हायरल होत असलेल्या फोटोची चर्चा रंगत आहे.

News Title : Kangana Ranaut On Her Fake Photo With Abu Salem

महत्वाच्या बातम्या- 

“ससूनभोवती दाटलेले संशयाचे धुके…”, सुप्रिया सुळेंची सरकारकडे थेट मागणी

“गाडीवरून पाय पुरतात का तुमचे?”; ऊंचीवरून डवचणाऱ्या नेटकऱ्याला दत्तू मोरेचं रंजक प्रत्युत्तर

RBI कडून ‘या’ दोन बँकांवर मोठी कारवाई; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

ब्रह्मपुरीत पारा 47 अंशांच्या पार; ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा हायअलर्ट

“छगन भुजबळांना आवरा, वयाचा आदर करतो, पण उठसूट काहीही..”; ‘या’ नेत्याचा थेट इशारा

Join WhatsApp Group

Join Now