Kalyan Loksabha Election | कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Loksabha Election) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या नेत्या आणि उमेदवार वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांआधी मनसेच्या वैशाली दरेकर या नगरसेवक होत्या. मात्र त्या आता शिवसेना ठाकरे गटातून निवडणूक लढताना दिसत आहेत. (Kalyan Loksabha Election)
कल्य़ाण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Loksabha Election) प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळत आहे. एका बाजूला मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर या श्रीकांत शिंदे यांना जड जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र आता हे 4 जून रोजी समोर येईल. दरम्यान, कल्याण लोकसभा मतदारसंघातून (Kalyan Loksabha Election) एक मोठी माहिती समोर आली आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदारांचा गोंधळ
कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू झाल्यापासून एका गोष्टीला घेऊन गोंधळ झाला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांचे मतदान यादीमध्ये नाव नसल्याचं समजतंय यामुळे नागरिकांनी गोंधळ घातला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रात हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाहीतर कल्याण मतदारसंघात काही भागात ईव्हीएम बंद पडल्याची घटना घडली आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक मतदनाच्या टप्प्यात ईव्हीएम बंद पडण्याच्या घटना घडताना दिसत आहेत. यामुळे मतदारांचा खोळंबा होताना दिसत आहे. मात्र काही वेळानंतर ईव्हीएम मशीन चालु झाली असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी लोकसभा मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे.
वैशाली दरेकर विरूद्ध श्रीकांत शिंदे
कल्याण लोकसभा मतदारसंघात प्रतिष्ठेची लढत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटातून वैशाली दरेकर निवडणूक लढवत आहेत. तसेच शिंदे गटातून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे निवडणूक लढवत आहेत. यामुळे दोन्ही बाजूने जोरदार संघर्ष होताना दिसत आहे. मात्र येत्या 4 जून दिवशीच याबाबत अधिकृत माहिती समोर येईल.
News Title – Kalyan Loksabha Election Shrikant Shinde Vs Vaishali Darekar Marathi News
महत्त्वाच्या बातम्या
एमएस धोनीच्या आयपीएल निवृत्ती संदर्भांत मोठी अपडेट; जाणून घ्या धोनी CSK ला कधी निरोप देणार?
दुःखद घटना; राष्ट्राध्यक्षांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन
फोर्ड कंपनी बाजारात धुमाकूळ घालणार; नवीन SUV कारची एंट्री
महत्वाची बातमी! हवामान विभागाने मान्सूनबाबत दिली महत्त्वाची अपडेट
राज्यातील ‘या’ दिग्गजांचं भवितव्य आज ठरणार! लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा कसा असणार?






