कल्याण मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी गोकूळ झा च्या आईचा धक्कादायक दावा

On: July 23, 2025 5:26 PM
Kalyan assault case
---Advertisement---

Kalyan assault case | नांदिवलीतील एका खासगी क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीवर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात आता नवा वळण आला आहे. आरोपी गोकूळ झा याच्या आईने प्रसारमाध्यमांसमोर येत संपूर्ण घटनेबाबत आपली बाजू मांडली असून काही धक्कादायक दावे केले आहेत.

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आरोपी झा पोलिसांच्या ताब्यात असला तरी त्याच्या आई छेमा झा यांनी आता समोर येत परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

“रिसेप्शनिस्टने वाद निर्माण केला” – आरोपीच्या आईचा दावा :

छेमा झा यांनी सांगितलं की, “माझ्या लहान नातीला खोकला आणि उलट्यांचा त्रास होत असल्याने आम्ही दवाखान्यात गेलो. डॉक्टरांना कळवण्यासाठी माझा मुलगा गेला असता रिसेप्शनवर असलेल्या तरुणीने त्याच्याशी उद्धटपणे वागत ‘तुम्हाला अक्कल नाही का?’ असं म्हटलं. त्यामुळे त्याने टेबलाला लाथ मारली. आम्ही त्याला शांत करत बाहेर नेलं.”

त्यानंतर आरोपीनं असंही सांगितलं की, “माझ्या सुनेला त्या रिसेप्शनिस्ट तरुणीने मारहाण केली, हे पाहून माझा मुलगा पुन्हा आत गेला आणि संतापाच्या भरात त्याने त्या मुलीवर हल्ला केला.”

Kalyan assault case | “माझा मुलगा मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे” – आईने मागितली माफी :

छेमा झा म्हणाल्या, “माझ्या मुलाच्या डोक्याला अपघातात मार लागला होता, त्यामुळे त्याला लवकर राग येतो. आर्थिक परिस्थितीमुळे त्याच्यावर उपचार करणे शक्य झाले नाही. आम्ही मान्य करतो की आमचा मुलगा चुकीचा होता. आम्ही संपूर्ण समाजाची माफी मागतो. माझा मोठा मुलगा चांगला आहे, कृपया त्याला सोडण्यात यावं.” (Kalyan assault case)

या प्रकारामुळे कल्याण परिसरात आणि समाज माध्यमांवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित तरुणीवर अत्याचार झाल्याचे व्हिडीओ समोर आल्यामुळे पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस तपास सुरू असून सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

News Title: Kalyan Assault Case: Major Update as Accused Jha’s Mother Reveals Her Side of the Incident

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now