चित्रपटसृष्टीला हादरवून टाकणारी घटना; प्रसिद्ध निर्मात्याची आत्महत्या

On: February 3, 2025 6:03 PM
kabali producer KP Chowdary commits suicide in goa
---Advertisement---

 KP Chowdary | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला हादरवून टाकणारी घटना घडली आहे. लोकप्रिय निर्माते के. पी. चौधरी ( KP Chowdary) यांनी गोवा येथे आत्महत्या केली आहे. गेल्या काही काळापासून ते आर्थिक समस्या आणि नैराश्याचा सामना करत होते, असे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक अडचणींमुळे ते त्रस्त होतेच, शिवाय ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात गेल्यानंतर त्यांची मानसिक स्थिती आणखी खालावली होती.

के. पी. चौधरी हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले निर्माते होते. त्यांनी सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘कबाली’ या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केली होती. २०२३ मध्ये त्यांना हैदराबाद पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. त्यांच्यावर ड्रग्जचा धंदा केल्याचा आरोप होता. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि कर्ज फेडण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. कोरोना काळातील लॉकडाऊननंतर ते आर्थिकदृष्ट्या आणखी खचले आणि उदरनिर्वाहासाठी ड्रग्जच्या व्यवसायात ओढले गेले, अशी माहिती समोर येत आहे.

के. पी. चौधरी यांची आत्महत्या

के. पी. चौधरी ( KP Chowdary) यांनी गोव्यात ‘OHM’ नावाचा एक पब सुरू केला होता. या पबमध्ये ते ग्राहकांसोबत ड्रग्जचा व्यवहार करत असत आणि प्रसिद्ध सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवत असत, असा आरोप होता. के. पी. चौधरी निर्मित ‘कबाली’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची प्रमुख भूमिका होती. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे बजेट जवळपास १०० कोटी रुपये होते.  या चित्रपटाने ३०० कोटींहून अधिक कमाई केली होती. ‘कबाली’ हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रजनीकांत आणि राधिका आपटे यांच्या मुख्य भूमिका होत्या.

Title : kabali producer KP Chowdary commits suicide in goa

 

Join WhatsApp Group

Join Now