क्रीडा विश्वात खळबळ! भारताचा प्रसिद्ध कबड्डीपटू विरोधात पत्नीची तक्रार

On: February 28, 2025 4:27 PM
Kabaddi Player Deepak Hooda Accused of Dowry Harassment
---Advertisement---

Deepak Hooda | भारताचा प्रसिद्ध कबड्डीपटू दीपक हुडा (Deepak Hooda) याच्याविरुद्ध त्याची पत्नी स्वीटी बोरा (Sweety Bora) हिने हुंड्यासाठी छळ आणि मारहाणीचा आरोप करत एफआयआर (FIR) दाखल केला आहे. ही घटना क्रीडा विश्वात खळबळजनक ठरली आहे.

लग्नाच्या तीन वर्षानंतर छळाचा आरोप

दीपक हुडा आणि स्वीटी बोरा यांचा विवाह २०२२ मध्ये झाला होता. लग्नाच्या तीन वर्षानंतर स्वीटीने हुंड्यासाठी छळ होत असल्याचा आरोप केला आहे. स्वीटीने हरियाणातील (Haryana) हिसार (Hisar) येथे दीपक हुडाविरुद्ध २५ फेब्रुवारी रोजी एफआयआर दाखल केला.

अर्जुन पुरस्कार विजेता खेळाडू

दीपक हुडाला भारत सरकारने अर्जुन पुरस्काराने (Arjuna Award) सन्मानित केले आहे. त्याने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघासोबत सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच, तो प्रसिद्ध प्रो कबड्डी लीगमध्येही (Pro Kabaddi League) खेळला आहे.

स्वीटी बोरा स्वतः क्रीडापटू

विशेष म्हणजे, दीपक हुडाची पत्नी स्वीटी बोरा हिला देखील अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. ती बॉक्सिंगमधील (Boxing) माजी विश्वविजेती आहे.

या घटनेमुळे दीपक हुडाच्या (Deepak Hooda) समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Title : Kabaddi Player Deepak Hooda Accused of Dowry Harassment

 

Join WhatsApp Group

Join Now