“रात्री 11 वाजले तरीही चालेल पण मतदान करूनच जाणार,” जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्यात गोंधळ

On: May 20, 2024 5:26 PM
Jitendra Awhad
---Advertisement---

Jitendra Awhad | आज राज्यात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा टप्पा पूर्ण होणार आहे. याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. राज्यात लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महानगरांमध्ये देखील मतदान होताना दिसत आहे. मात्र आजचं मतदान अगदी धिम्या गतीने होताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्रा येथे मतदान अगदी धिम्या गतीने होताना दिसत आहे. यामुळे निम्म्याहून अधिक नागरिकांना घरी जाण्यासाठी परावृत्त केलं जात असल्याचं बोललं जात आहे.

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया :

मुंब्रा येथे अनेकांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली आहे. येथे खुद्द जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) मतदान करण्यासाठी उपस्थित होते. तसेच त्यांनी काही वेळ आपली उपलब्धता दाखवली होती. यावेळी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मतदानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. मतदान अगदी धिम्या गतीने होत असल्याने नागरिक संतापले आहेत. हे सर्व मुद्दामुन होत असल्याचं ते बोलले आहेत.

मुंब्रा येथे धिम्या गतीने मतदान होत असल्याने एका महिलेले संताप देखील व्यक्त केला आहे. रात्री 11 वाजले तरीही चालेल मात्र मी माझं मत दिल्याशिवाय जाणार नाही. यावेळी हे सर्व मुद्दामुन सुरू असल्याचं वक्तव्य अन्य एका मतदाराने केलं. यावेळी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की,  “मी निवडणूक निरीक्षक मनोज जैनशी बोललो. काही अधिकारी मुद्दामून करतायत. खुसपट काढतायतय. हे इथेच नाही, कळव्यात सुद्धा चालू आहे. लोकांना परत पाठवल जातय” असं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले आहेत.

“कितीही वाजू दे रात्री 11 वाजू दे तो मतदान करणारच” : 

सहा वाजता मतदार मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी रांगेत उभा राहिल. मग त्याला कितीही वाजू दे रात्री 11 वाजू दे तो मतदान करणारच. मी याबद्दल लवकरच एक व्हिडीओ पोस्ट करेल, असं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले आहेत. (Jitendra Awhad)

कायदा जे सांगते तेच सांगत आहे. जेवढा मतदानाला वेळ लागेल तेवढा वेळ मतदानासाठी द्यावाच लागेल. 6 वाजेपर्यंत जेवढे मतदार असतील त्या लोकांकडून मतदानाचा अधिकार द्यावा लागेल. अधिकारी मुद्दामुन गप्पा मारत आहेत. खेळत आहेत, वेळ वाया गालवत आहेत, असा दावा आव्हाडांनी केला आहे.

News Title – Jitendra Awhad’s Mumbra in Slowly Slowly Voting Election Situation

महत्त्वाच्या बातम्या

रात्री झोपण्यापूर्वी दूध पित असाल तर आत्ताच बंद करा; होऊ शकतात गंभीर आजार

शेतकऱ्यांच्या पोटात आनंद मावेना, मान्सूनसंदर्भात मोठी अपडेट समोर

अभिनेत्री छाया कदम यांची आईसाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट, “आई तु आज हवी होतीस…”

“…वयस्कर मतदार प्रतीक्षा करून घरी परतत आहेत”, ईव्हीएम मशीन बंद असल्याने आदेश बांदेकरांचा संताप

कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदारांचा उडाला गोंधळ

Join WhatsApp Group

Join Now