फक्त 1 रुपया फरक, पण फायदे वेगळे; Jio चा हा बेस्ट प्लॅन एकदा बघाच!

On: April 8, 2025 8:27 AM
Jio best prepaid plan
---Advertisement---

Jio best prepaid plan | जिओ (Jio) वापरकर्त्यांसाठी 200 रुपयांखालील दोन प्रीपेड प्लॅन सध्या चर्चेत आहेत – एक ₹198 चा आणि दुसरा ₹199 चा. दोन्हीमध्ये फक्त 1 रुपयांचा फरक आहे, पण त्यांचे फायदे मात्र खूप वेगळे आहेत. कोणता प्लॅन निवडावा हे तुमच्या गरजांवर अवलंबून आहे, या दोन्ही प्लॅनबाबत सविस्तर पाहुयात. (Jio best prepaid plan)

 198 चा प्लॅन:

  • डेटा: दररोज 2GB, एकूण 28GB
  • वैधता: 14 दिवस
  • अन्य फायदे: अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS, अमर्यादित 5G डेटा (जिओ नेटवर्कमध्ये), JioTV आणि JioCloud सबस्क्रिप्शन

हा प्लॅन अशा युजर्ससाठी योग्य आहे ज्यांना दिवसाला जास्त डेटा लागतो. परंतु या प्लॅनची वैधता फक्त 14 दिवस असल्यामुळे, वापरकर्त्यांना लवकरच परत रिचार्ज करावे लागते.

₹199 चा प्लॅन:

  • डेटा: दररोज 1.5GB, एकूण 27GB
  • वैधता: 18 दिवस
  • अन्य फायदे: या प्लॅनमध्ये देखील  अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 SMS, अमर्यादित 5G डेटा (जिओ नेटवर्कमध्ये), JioTV आणि JioCloud सबस्क्रिप्शन मिळते.

फक्त ₹1 जास्त खर्च करून तुम्हाला 4 दिवस अधिक सेवा मिळते, आणि डेटा देखील जवळपास तेवढाच आहे. जर तुम्हाला फोनचा जास्त काळ वापर हवा असेल, तर हा प्लॅन अधिक फायदेशीर ठरतो.

काय निवडावे?

तुम्हाला जास्त डेटा हवे असेल तर 198 रुपयांचा प्लॅन योग्य आहे, पण जास्त दिवस सेवा हवी असेल तर 199 रुपयांचा प्लॅन उत्तम. विशेषतः जिओ 5G वापरणाऱ्या युजर्ससाठी, डेटा मर्यादा फारसा महत्वाचा नसतो कारण दोन्ही प्लॅनमध्ये अमर्यादित 5G आहे.

English Title : Jio best prepaid plan Offers  

Join WhatsApp Group

Join Now