Jio 349 Plan | जर तुम्ही कमी खर्चात उत्तम पोस्टपेड प्लान शोधत असाल, तर Jio, Airtel आणि Vi कंपन्यांचे काही स्वस्त आणि फायदेशीर पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. यातील काही प्लान्समध्ये JioHotstarसारख्या प्रीमियम सब्स्क्रिप्शनचा लाभही मिळतो. (Jio 349 Plan )
Airtel चा 449 रुपयांचा पोस्टपेड प्लान
एअरटेलकडून ‘इन्फिनिटी 449’ नावाचा पोस्टपेड प्लान सध्या उपलब्ध आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 100 SMS आणि एकूण 50GB डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील आहे. या प्लानमध्ये Airtel Xstream Play Premium, Apollo 24/7 Circle, फ्री HelloTunes, Blue Ribbon Bag आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3 महिन्यांसाठी JioHotstar (मोबाईल) सब्स्क्रिप्शन मोफत दिलं जातं. मात्र, या प्लानमध्ये कर (GST) समाविष्ट नाही, त्यामुळे अंतिम बिलात 18% GST वेगळा भरावा लागतो.
Jio चा सर्वात स्वस्त 349 रुपयांचा पोस्टपेड प्लान
जिओकडून उपलब्ध असलेला 349 रुपयांचा पोस्टपेड प्लान हा सर्वात स्वस्त पर्याय आहे. यामध्ये वापरकर्त्यांना दररोज 100 SMS आणि एकूण 30GB डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर प्रति GB 10 रुपये आकारले जातात. यासोबत अनलिमिटेड 5G डेटा, JioTV आणि JioAI Cloud यांसारखे फायदे मिळतात. विशेष म्हणजे, या प्लानसोबत ग्राहकांना 90 दिवसांसाठी JioHotstar चे (फोन किंवा टीव्ही) सब्स्क्रिप्शन मोफत दिलं जातं. अंतिम बिल 18% GSTसह येते.
Vi चा 451 रुपयांचा वीआय मॅक्स प्लान
Vi कडून ‘Vi Max 451’ नावाचा पोस्टपेड प्लान देण्यात येतो. यात दरमहा 3000 SMS, 50GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळते. यामध्ये 200GB रोलओव्हर डेटा आणि रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान अनलिमिटेड नाईट डेटा मिळतो. मुंबईतील ग्राहकांना या प्लानसोबत अनलिमिटेड 5G डेटा देखील मिळतो. यासोबत Vi Games चा प्रवेश आणि ग्राहकांना Vi Movies & TV, JioHotstar, SonyLiv, EaseMyTrip किंवा Norton Mobile Security यापैकी कोणताही एक फायदा निवडण्याचा पर्यायही दिला जातो.
Title : Jio 349 Plan with OTT Benefits






