Jheel Mehta wedding | झील मेहता (Jheel Mehta wedding ) या अभिनेत्रीने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये बालकलाकार म्हणून सोनूची भूमिका साकारली होती. अशात अभिनेत्री पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकली आहे. विशेष म्हणजे तिने हा विवाह दुसऱ्या कोणाशी नाही, तर तिचा पती आदित्य दुबे (Aditya Dubey) याच्यासोबतच रजिस्टर पद्धतीने केला आहे.
विशेष म्हणजे, झील तीन महिन्यांत दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झील मेहतानं आदित्यसोबत लग्नगाठ बांधली होती. अशात तिने दुसऱ्यांदा रजिस्टर पद्धतीने लहन केलंय.
झील आणि आदित्यचा दुसऱ्यांदा विवाह
झीलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यात ती पुन्हा विवाहबंधनात अडकताना दिसत आहे. तीन महिन्यांपूर्वीच डिसेंबर 2024 मध्ये झील आणि आदित्यचा शाही विवाह सोहळा पार पडला होता.
मात्र, 17 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांनी रजिस्टर पद्धतीने कायदेशीररित्या लग्न केले. या खास प्रसंगी दोघांनी आयव्हरी रंगाचे पोशाख परिधान केले होते आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांनी कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करत लग्न विधी पूर्ण केला.
झीलने या क्षणाचा व्हिडीओ शेअर करत लिहिले, “शेवटी कायदेशीररित्या लग्न झालं. 17•02•25”. व्हिडीओमध्ये दोघांचे प्रेम आणि आनंद स्पष्ट दिसत आहे.
डिसेंबरममध्ये पार पडला शाही विवाह सोहळा
झील (Jheel Mehta wedding )आणि आदित्यने तीन महिन्यांपूर्वी पारंपरिक पद्धतीने थाटामाटात विवाह केला होता. तिच्या लग्नाच्या सर्व विधींना चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला होता. लग्नाच्या दिवशी झीलने लाल रंगाचा भव्य लेहेंगा परिधान केला होता. त्यावर कुंदन ज्वेलरी आणि क्लासिक दुपट्ट्याने तिने तिचा नववधू लूक पूर्ण केला होता. आता तिने दुसऱ्यांदा लग्न करत त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावर देखील चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
Title : Jheel Mehta wedding with Husband Aditya









