अजित पवार महायुतीतून बाहेर पडले तर…? शरद पवारांच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल

On: November 11, 2024 5:13 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Ajit Pawar l विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. अशातच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये देखील आरोप-प्रत्यापाचं राजकारण रंगलं आहे. मात्र आता महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र बटेंगे तो कटेंगे हे वक्तव्य बरोबर नसल्याचं म्हटलं आहे. कारण यावरून आता जयंत पाटील यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

जयंत पाटील यांचा अजितदादांवर हल्लाबोल :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, ‘एक है तो सेफ है या विधानाला आता उपमुख्यमंत्री अजित पवार विरोध करत आहेत, मात्र याला काहीही अर्थ नाही. परंतु आता अजित पवारांनी त्या आघाडीतून बाहेर पडले तर त्याला अर्थ आहे, कारण त्यांच्या सोबत रहायचे आणि त्यांच्या एका विधानाला विरोध करायचा हे मात्र ठीक नसल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत.

शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहमदपूर मतदार संघातील उमेदवार विनायकराव पाटील यांच्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या चाकुर येथे सभा घेतली. त्यावेळी जयंत पाटील यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान जयंत पाटील यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.

घटना दुरुस्ती करण्याच पाप भाजपच्या मनात होतं :

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात काय काम केले आहे? ते त्यांनाच माहीत असं देखील जंयत पाटील म्हणाले आहेत. यासोबतच शरद पवार यांनी देखील भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करण्याचा विचार हा महाविकास आघाडी करत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 400 खासदार हवे असे सांगत होते. परंतु तेवढे लागत नाही पण लोकांना मात्र शंका आली. यामध्ये काही काळ बेर दिसत दिसत आहे.

मात्र 400 जागा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत घटना बदलता येणार नाही अशी माहिती त्यांच्याच लोकांनी जनतेला सांगितली आहे. तसेच घटना दुरुस्ती करण्याच पाप यांच्या मनात होतं असा टोला देखील शरद पवार यांनी लगावला आहे.

News Title : Jayant patil aginst on ajit pawar 

महत्वाच्या बातम्या –

राज्यात नवीन अभियान सुरु; “जो पाजील माझ्या नवऱ्याला दारु, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू”

कराळे मास्तरांनी मोदींच्या शिक्षणाचा मुद्दा छेडला! नेमकं काय म्हणाले

…म्हणून अनुपम खेर भाड्याच्या घरात राहतात; कधीच खरेदी करणार नाहीत स्वतःच घर

महायुती की पुन्हा महाविकास आघाडी, राज्यात कोण मारणार बाजी?; सर्व्हेतून मोठी माहिती समोर

मनसेतून वंचित मग ठाकरे गटात गेले, आता वसंत मोरे थेट तुतारी फुंकणार?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now