Nitesh Karale l राज्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेतेमंडळी सभा घेण्यावर भर देत आहेत. अशातच जळगावातील पारोळा येथे महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते. यावेळी शरद पवार गटाचे प्रवक्ते नितेश कराळे यांनी जोरदार भाषण केलं आहे.
मोदींच्या शिक्षणाचा मुद्दा छेडला :
जळगावातील पारोळा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार व माजी मंत्री सतीश पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा पार पडली आहे. या सभेत प्रवक्ते नितेश कराळे यांनी भाषण केलं आहे. त्यावेळी कराळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणाचा मुद्दा छेडला आहे.
Nitesh Karale l साहेबांच्या राज्यात रोज सभा :
यावेळी ते म्हणाले की, दाढीवाल्याचे तीन फोटो भेटले तर पाठवत जा. कारण मी सध्या त्यावर रिसर्च करत आहे. तसेच चहा विकतानाचा लग्नाचा आणि डिग्री घेतानाचा असे तीन फोटो भेटले तर मला पाठवा. कारण मला ते फोटो भेटून नाही राहिले नाहीत. तसेच जी पदवी घेतली तर विषयच आपल्या पूर्ण भारतामध्ये नाही. तसेच त्या पदवीवर देखील विद्यापीठाचे स्पेलिंग सुद्धा चुकलेला आहे असं नितेश कराळे म्हणाले आहे.
याशिवाय गद्दाराचं सरकार गेलं पाहिजे. तसेच आम्ही यासाठी राज्यात फिरत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला न्याय द्यायला पाहिजेच, म्हणून शरद पवार साहेबांच्या राज्यात रोजच्या चार ते पाच सभा होत आहे. तसेच तुमच्यासाठी साहेब हे करत आहे, त्यामुळे तुम्ही साहेबांना साथ द्याल का? असं नितेश कराळे गुरुजी म्हणाले आहेत.
News Title : Nitesh Karale on PM Narendra Modi
महत्वाच्या बातम्या –
…म्हणून अनुपम खेर भाड्याच्या घरात राहतात; कधीच खरेदी करणार नाहीत स्वतःच घर
महायुती की पुन्हा महाविकास आघाडी, राज्यात कोण मारणार बाजी?; सर्व्हेतून मोठी माहिती समोर
मनसेतून वंचित मग ठाकरे गटात गेले, आता वसंत मोरे थेट तुतारी फुंकणार?
“जिल्ह्यात ऊस शेतकऱ्यांना उच्चांकी दर देणार”; संभाजी निलंगेकरांची घोषणा






