महाराष्ट्रातील प्रसिद्ध रीलस्टारची बापाकडून हत्या, सुसाईड नोटमध्ये केला मोठा खुलासा

On: February 28, 2025 11:20 AM
Jalgaon Reelstar Murder Father Kills Son Commits Suicide
---Advertisement---

Jalgaon Reelstar Murder | जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका माजी सैनिकाने आपल्या रीलस्टार मुलाची हत्या करून नंतर आत्महत्या केली. मुलाच्या छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. (Jalgaon Reelstar Murder)

विठ्ठल पाटील यांच्या खिशात सापडली सुसाईड नोट

विठ्ठल पाटील यांचा मृतदेह गुरुवारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांना त्यांच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये त्यांनी मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. तसेच मुलाचा मृतदेह कुठे आहे, याची माहितीही त्यांनी चिठ्ठीत दिली होती. मुलगा दारू पिऊन छळ करत असल्याने आपण त्याला संपवल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले.

रीलस्टार मुलगा हितेश आणि वडिलांचे विभक्त वास्तव्य

विठ्ठल पाटील हे मूळचे एरंडोल तालुक्यातील भवरखेड येथील रहिवासी होते, परंतु ते एरंडोल येथील वृंदावन नगर परिसरात कुटुंबासह राहत होते. त्यांचा मुलगा हितेश हा रीलस्टार होता आणि सोशल मीडियावर (Social Media) विविध विषयांवर रील्स (Reels) बनवायचा. तो वडिलांपासून वेगळा राहत होता.

हितेशचे दारूचे व्यसन आणि वडिलांना मारहाण

हितेशला दारूचे व्यसन होते आणि दारू प्यायल्यानंतर तो अनेकदा वडिलांच्या घरी जाऊन त्यांना मारहाण करत असे, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Title : Jalgaon Reelstar Murder Father Kills Son Commits Suicide

 

Join WhatsApp Group

Join Now