‘बिग बाॅस’ फेम जान्हवी किल्लेकरने केला लिलाव?; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

On: October 26, 2024 7:53 PM
---Advertisement---

Jahnavi Killekar | बिग बाॅस फेम जान्हवी किल्लेकर तिच्या भांडकुदळ स्वभावामुळे चर्चेत आली होती. एवढंच नाही तर, मराठमोळा अभिनेता पंढरीनाथ(पॅडी) कांबळे यांचा बिग बाॅसच्या घरात आपमान केल्यामुळे जान्हवी चांगलीच ट्रोल झाली. बिग बाॅसच्या घरात असताना जान्हवी तिच्या ड्रेसिंगमुळे देखील चर्चेत होती. अनेकवेळा बिग बाॅसने जान्हवीचं कौतुक केलं होतं. दरम्यान आता जान्हवी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

काय आहे प्रकरण?

बिग बाॅसमध्ये जान्हवीने घातलेल्या कपड्यांची सध्या जोरदार चर्चा आहे. बिग बाॅसच्या घरात जान्हवीने घातलेल्या कपड्यांचा लिलाव होणार असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी शोमधून बाहेर आल्यानंतर घरात घातलेले कपडे किंवा तिचे नाईट सुट्सचा जान्हवी लिलाव करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या चर्चेवर जान्हवीने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हायरल व्हिडीओ-

व्हिडीओमध्ये जान्हवीने (Jahnavi Killekar) या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. पुढे ती म्हणाली की, अनेकजण मला फोन करुनही याबाबत विचारत आहेत. सुरुवातीला मला यावर विश्वास बसत नव्हता पण आता मी स्वतःहून ते वाचलं. जान्हवी ‘बिग बॉस’च्या घरात घातलेल्या कपड्यांचा लिलाव करणार आहे.

एवढंच नाही तर जान्हवी (Jahnavi Killekar) पुढे म्हणली की, बिग बाॅसच्या घरात घेतलेले 100 ड्रेस आणि 40 नाईटींचा लिलाव करण्यात आला आहे. पण या सगळ्या गोष्टींचा काय संबंध आहे? मी 100 ड्रेस घेतले आहेत आणि ते मी पुढे वापरणार आहे त्याचा लिलाव मी का कारेन? असा प्रश्न जान्हवीने विचारला आहे.

जान्हवीने व्हिडीओ शेअर करत असंही म्हटलं की, “कृपया मी सगळ्यांना विनंती करेन की अशा अफवा उगीच पसरवू नका. मला कोणतेही माझे कपडे विकायचे नाही आणि ते मुळात विकण्यासारखे नाही आहेत. ते माझे कपडे आहेत त्यामुळे माझे कपडे मी का विकू?. ते कपडे खूप महागडे नाही आहेत. त्यामुळे विनंती आहे की, उगीच काहीही अफवा पसरवू नका”. अशी तिने विनंती केली आहे.

News Title : jahnavi killekar to auction dress used in big boss show

महत्त्वाच्या बातम्या-

कसब्यातील भाजपचा उमेदवार ठरला; ‘हा’ नेता देणार धंगेकरांना टफ फाईट

उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा झटका!

शरद पवार पक्षाची तिसरी यादी जाहीर! पाहा संपूर्ण यादी एका क्लीकवर

“पोरं तरी कशी झाली…”; जयश्री थोरातांबद्दल भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

महायुतीतील सर्वजण मिळून अमित ठाकरेंना विजयी करू; भाजप नेत्याचं मोठं विधान

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now