बापरे! चप्पल व्यावसायिकाकडे मिळाली कोटींची संपत्ती; नोटा मोजून अधिकारीही थकले

On: May 19, 2024 11:07 AM
IT Raid On Three Shoe Traders In Agra
---Advertisement---

IT Raid | आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल 40 कोटी रुपयांची रोकड मिळाली आहे. उत्तर प्रदेशातील आग्रामधील चप्पल व्यावसायिकांच्या घरातून ही रक्कम मिळाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने नोटा मोजण्याची जबाबदारी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सोपवली आहे.

आग्रामधील तीन बुटांच्या व्यापाऱ्यांवर छापा टाकण्यात आल्यानंतर ही रोकड मिळाली. यामध्ये 500 रुपयांच्या देखील भरपूर नोटा आहेत. अधिकारी आता त्याची मोजणी करत आहेत. नोटांची एवढी रोकड बघून अधिकारी देखील थकले आहेत. मात्र, अजूनही ही मोजणी संपली नसल्याची माहिती आहे.

40 कोटींची रोकड जप्त

अजूनही बरीच रक्कम मोजणी राहिली आहे. आयकर विभागाला याबाबत माहिती मिळाली असता त्यांनी लागलीच छापा टाकला. या बेहिशेबी संपत्तीची आता कसून चौकशी केली जात आहे.

आयकर विभागाने आग्रा, लखनऊ आणि कानपूर येथील तीन बुटांच्या व्यावसायिकांच्या सहा ठिकाणी छापे टाकले. यामध्ये आग्रा येथील एमजी रोडवर असलेल्या बीके शूजच्या आस्थापना आणि सूर्यानगर येथील घराची झडती घेण्यात आली.

तीन बुटांच्या व्यावसायिकांवर कारवाई

व्यापारी मंशु फूटवेअर आणि बीके शूजच्या (IT Raid) मालकांची आता चौकशी केली जात आहे. छापेमारी सुरु असलेल्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. जवळपास 5 तास चाललेल्या या छाप्यात आयकर विभागाच्या पथकाने शोरूमच्या प्रत्येक कोपऱ्याची झडती घेतली.

चप्पल व्यापाऱ्याच्या अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम मिळाल्याने खळबळ उडाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात करचोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

News Title- IT Raid On Three Shoe Traders In Agra

महत्त्वाच्या बातम्या –

पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घसरण?; जाणून घ्या आजच्या लेटेस्ट किंमती

“बॉयफ्रेंडने बाथरुममधला व्हिडिओ..”; पुनम पांडेचा पुन्हा एकदा खळबळजनक खुलासा

‘या’ भागांत तापमान जाणार 40 शी पार?; हवामान विभागाचा हायअलर्ट

चेन्नईला नमवत RCB प्लेऑफमध्ये; विराटला अश्रु अनावर, Video व्हायरल

‘या’ राशीच्या व्यक्तींना व्यवसायातून मोठा धनलाभ होईल!

Join WhatsApp Group

Join Now