“…म्हणून शुभमन गिलमुळे इशान किशनचं द्विशतक हुकलं?”, अखेर इशाननेच उघड केलं मोठ सीक्रेट!

On: June 18, 2026 7:46 PM
Ishan Kishan
---Advertisement---

Ishan Kishan | भारताने अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सलग दुसरा विजय मिळवत मालिका आपल्या नावावर केली आहे. दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 402 धावांचे मोठे लक्ष्य उभे केले. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव 232 धावांवर आटोपला आणि भारताने 170 धावांनी शानदार विजय नोंदवला. या सामन्यात कर्णधार शुबमन गिल (Shubman Gill) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांच्या शतकी खेळीची विशेष चर्चा रंगली.

द्विशतक हुकण्यामागचं कारण काय?

अफगाणिस्तानविरुद्ध इशान किशनने केवळ 79 चेंडूंमध्ये 125 धावांची तुफानी खेळी साकारली. त्याच्या या खेळीत आक्रमक फलंदाजीचा प्रत्यय आला. मात्र, द्विशतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना तो खरोटेच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अलिखिलकडे झेल देऊन बाद झाला. विशेष म्हणजे, बाद होण्यापूर्वी त्याने सलग दोन चेंडूंवर षटकार ठोकले होते. तिसऱ्या चेंडूवरही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याची खेळी संपुष्टात आली.

सामन्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सोशल मीडिया व्हिडिओमध्ये इशान किशनने मजेशीर अंदाजात शुबमन गिलमुळे आपले द्विशतक हुकल्याचे सांगितले. “त्याने मला सतत मोठे फटके खेळण्याचे आव्हान दिले आणि सहा षटकार मारण्याच्या प्रयत्नात माझ्या 70 धावा कमी झाल्या,” असे तो हसत म्हणाला. त्याने स्पष्ट केले की, खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने भागीदारी टिकवून ठेवत संधी मिळेल तेव्हा आक्रमक खेळी करण्याचा त्यांचा विचार होता.

Ishan Kishan | कर्णधाराच्या सल्ल्याचा झाला फायदा :

सामन्यानंतरच्या संवादात शुबमन गिलने इशानला काही षटकांपर्यंत स्ट्राइक का दिली नाही, असा प्रश्न विचारला. यावर इशानने सांगितले की, कर्णधाराला जाणीवपूर्वक स्ट्राइक न देण्याचा कोणताही विचार नव्हता. फिरकी गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके खेळण्यावर त्याचा भर होता.

इशान किशनने पुढे सांगितले की, मोठी खेळी घडवण्यात कर्णधाराची महत्त्वाची भूमिका असते. काहीवेळा जलद धावा करण्याचा प्रयत्न करत असताना शुबमन गिलने संयम राखण्याचा सल्ला दिला. अजून भरपूर वेळ असल्याचे सांगत त्याने योग्य चेंडूची वाट पाहण्यास सांगितले. मोठी खेळी कशी उभारायची याचा गिलला चांगला अनुभव असल्याने त्याच्या मार्गदर्शनाचा फायदा झाल्याचेही इशानने नमूद केले.

News Title: Ishan Kishan Reveals Gill’s Challenge

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now