‘ही’ अभिनेत्री होणार मोदी कुटुंबाची सून? लग्नाच्या चर्चांवर तिने अखेर मौन सोडलं

On: January 7, 2026 1:04 PM
Shraddha Kapoor
---Advertisement---

Shraddha Kapoor Marriage | बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाबाबतची उत्सुकता अनेक वर्षांपासून चाहत्यांमध्ये आहे. श्रद्धा नेमकं कधी लग्न करणार, हा प्रश्न सोशल मीडियावर वारंवार विचारला जातो. आता या प्रश्नावर स्वतः श्रद्धाने दिलेल्या एका उत्तरामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. या उत्तराचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

३८ वर्षांची श्रद्धा कपूर आजही इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. करिअरच्या सुरुवातीपासूनच तिच्या अभिनयासोबतच तिच्या रिलेशनशिप्सही नेहमी चर्चेचा विषय ठरल्या आहेत. ‘आशिकी 2’मधील आदित्य रॉय कपूरसोबत तिचं नाव मोठ्या प्रमाणावर जोडलं गेलं होतं. या जोडीला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दिली होती. त्यानंतर फरहान अख्तरसोबतही तिच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र वडील शक्ती कपूर यांच्या विरोधामुळे ते नातं पुढे जाऊ शकलं नाही, अशी चर्चा होती. (Rahul Modi relationship)

लग्नाच्या प्रश्नावर श्रद्धाचं थेट उत्तर :

अलीकडे श्रद्धाने तिच्या ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनसाठी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओखाली एका चाहत्याने थेट प्रश्न विचारला, “तू लग्न कधी करणार आहेस?” या प्रश्नावर श्रद्धाने दिलेलं उत्तर सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. “मी करणार, लग्न करणार,” असं थोडक्यात पण स्पष्ट उत्तर श्रद्धाने दिलं आहे.

या एका वाक्यामुळेच श्रद्धा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. विशेष म्हणजे श्रद्धा सध्या पटकथालेखक राहुल मोदीला डेट करत असल्याच्या चर्चा मागील काही काळापासून सुरू आहेत. त्यामुळे तिचं हे उत्तर राहुल मोदीशीच संबंधित असल्याचा अंदाज अनेक जण व्यक्त करत आहेत.

Shraddha Kapoor Marriage | श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांचं नातं :

श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी (Rahul Modi) यांच्या डेटिंगच्या चर्चांना २०२४ मध्ये सुरुवात झाली होती. दोघांना अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिलं गेलं. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यालाही श्रद्धा आणि राहुल एकत्र उपस्थित होते. त्याच वर्षी श्रद्धाने राहुलसोबत एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. (Shraddha Kapoor Marriage)

काही काळानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र २०२५ मध्ये दोघांना पुन्हा एकत्र पाहिलं गेल्याने या चर्चा फोल ठरल्या. श्रद्धा किंवा राहुल यांच्याकडून त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नसली, तरी श्रद्धाच्या सोशल मीडिया पोस्टमधून तिचं राहुलवरील प्रेम अनेकदा अप्रत्यक्षपणे दिसून आलं आहे.

News Title: Is Shraddha Kapoor Set to Marry Rahul Modi? Actress Finally Breaks Silence on Wedding Rumours

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now