इराणची मोठी माघार! ‘स्ट्रेट ऑफ होर्मूज’ पुन्हा खुला; संपूर्ण जगाला दिलासा

On: April 17, 2026 7:11 PM
Iran Strait Hormuz
---Advertisement---

Iran Strait Hormuz | अमेरिका (United States) आणि इराण (Iran) यांच्यातील तणावानंतर अखेर मोठा निर्णय समोर आला आहे. युद्धविरामानंतर इराणने जागतिक स्तरावर महत्त्वाचा असलेला स्ट्रेट ऑफ होर्मूज (Strait of Hormuz) मार्ग पुन्हा सर्व जहाजांसाठी खुला करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे जागतिक ऊर्जा संकट टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

युद्धानंतरची परिस्थिती आणि मर्यादित हालचाल :

28 फेब्रुवारीपासून सुरू झालेलं अमेरिका-इराण युद्ध तब्बल 39 दिवस सुरू होतं. 40 व्या दिवशी दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केली. या संघर्षादरम्यान इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज मार्ग बंद केल्याने जगभरात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता, कारण सुमारे 25 टक्के तेलाची वाहतूक याच मार्गाने होते.

युद्धविराम जाहीर झाल्यानंतरही हा मार्ग पूर्णपणे खुला करण्यात आला नव्हता. दिवसभरात केवळ 15 जहाजांनाच या मार्गाचा वापर करण्याची परवानगी देण्यात येत होती. दरम्यान इस्रायल (Israel) आणि लेबनॉन (Lebanon) यांच्यातील हल्ल्यांमुळे परिस्थिती अधिकच तणावपूर्ण राहिली आणि त्यामुळे ऊर्जा संकट पूर्णपणे टळू शकले नव्हते.

Iran Strait Hormuz | पूर्णपणे मार्ग खुला करण्याची घोषणा :

मात्र गुरुवारी इस्रायल आणि लेबनॉनमध्ये युद्धविराम झाल्यानंतर परिस्थितीत मोठा बदल झाला. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या मध्यस्थीने हा करार झाला. त्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री सैय्यद अब्बास अराघची (Seyyed Abbas Araghchi) यांनी सोशल मीडियावरून महत्त्वाची घोषणा करत स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा पूर्णपणे खुला केल्याची माहिती दिली.

इराणच्या या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेला दिलासा मिळाला असून तेल पुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

News title : Iran Reopens Strait of Hormuz After Ceasefire

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now