इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी कोमात; पाय कापला, पोट फाटल्याचा खळबळजनक दावा

On: March 13, 2026 10:47 AM
Mojtaba Khamenei
---Advertisement---

Iran new Supreme Leader: इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत असलेला पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस या युद्धाविषयी नवनवीन अपडेट समोर येत आहे. अशातच आता इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी (Mojtaba Khamenei) यांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोज्तबा खामेनी कोमात असून ते गंभीर जखमी असल्याची बातमी समोर येत आहे.

28 फेब्रुवारी 2026 रोजी अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर मोज्तबा यांनी सूत्रे हाती घेतली, मात्र ते अद्याप सार्वजनिकरीत्या समोर न आल्याने त्यांच्या प्रकृतीबाबतचे तर्कवितर्क अधिक गडद झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोज्तबा जिवंत असल्याचा अंदाज वर्तवलाय.

गंभीर दुखापत आणि कोमात असल्याचे दावे

मोज्तबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत विविध आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी धक्कादायक दावे केले आहेत: द सन (The Sun): ब्रिटीश वृत्तपत्र ‘द सन’च्या अहवालानुसार, मोज्तबा खामेनी हे अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून ते कोमात गेले आहेत. या अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, त्यांचा एक पाय कापला गेला असून यकृत आणि पोटाला (Abdominal injuries) गंभीर इजा झाली आहे.

सीएनएन (CNN): सीएनएनने त्यांच्या अहवालात मोज्तबा यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे आणि डोळ्याजवळ तसेच चेहऱ्यावर जखमा असल्याचे म्हटले आहे. तेहरानमधील सिना युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून, रुग्णालयाचा एक मोठा भाग पूर्णपणे सील करून तिथे कडक लष्करी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

गुरुवारी मोज्तबा खामेनी यांनी सर्वोच्च नेते म्हणून पहिले अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले. इराणच्या सरकारी टीव्हीवर हे निवेदन वाचून दाखवण्यात आले, मात्र मोज्तबा स्वतः स्क्रीनवर दिसले नाहीत. त्यांच्या या अनुपस्थितीमुळेच त्यांच्या प्रकृतीबाबतच्या संशयाला बळकटी मिळाली आहे. त्यांच्या निवेदनात त्यांनी ‘शहीदांच्या रक्ताचा बदला’ घेण्याची भाषा केली असून, होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद ठेवण्याचा आणि आखाती देशांतील अमेरिकन लष्करी तळ हटवण्याचा इशारा दिला आहे.

Join WhatsApp Group

Join Now