आयआरजीसी नेमकी आहे तरी काय? याच ताकदीवर इराण अमेरिका-इस्रायलला देतोय टक्कर!

On: March 19, 2026 2:36 PM
Iran Israel War
---Advertisement---

Iran Israel War | इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक नाव सतत चर्चेत आहे ते म्हणजे Islamic Revolutionary Guard Corps (IRGC). इराणची ही शक्तिशाली लष्करी संघटना केवळ सैन्यदल नाही, तर देशाच्या राजकीय आणि धोरणात्मक शक्तीचा कणा मानली जाते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत ही संघटना इराणची सर्वात मोठी ढाल म्हणून उभी राहिली आहे. ज्याच्या सामर्थ्याच्या जोरावर इराण अमेरिका-इस्रायलसमोर झुकत नाहीये.

आयआरजीसी म्हणजे काय?

1979 च्या Iranian Revolution नंतर IRGCची स्थापना करण्यात आली. त्या वेळी नवीन इस्लामिक सत्तेला जुन्या राजेशाहीशी निष्ठावान असलेल्या सैन्यावर पूर्ण विश्वास नव्हता. त्यामुळे स्वतंत्र आणि थेट सर्वोच्च नेत्याच्या नियंत्रणाखाली असलेली ही संघटना उभी करण्यात आली. आजही IRGC थेट Ali Khamenei यांना अहवाल देते, ज्यामुळे तिची ताकद अधिक वाढते.

इराणकडे दोन प्रमुख लष्करी व्यवस्था आहेत. नियमित सैन्य ‘Artesh’ आणि IRGC. ‘Artesh’ देशाच्या पारंपरिक संरक्षणासाठी काम करते, तर IRGCचे मुख्य ध्येय इस्लामिक व्यवस्थेचे रक्षण करणे आहे. विशेष म्हणजे IRGCकडे स्वतःचे भूदल, नौदल आणि हवाई दल आहे, ज्यामुळे ती स्वतंत्र सैन्यासारखी कार्य करते.

IRGCच्या सामर्थ्याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे तिचा क्षेपणास्त्र कार्यक्रम. इराणच्या बॅलिस्टिक मिसाइल्सचे नियंत्रण या संघटनेकडे आहे. तसेच ‘Quds Force’द्वारे ती परदेशातील गुप्त आणि लष्करी कारवाया सांभाळते. मध्यपूर्वेतील अनेक गटांशी तिचे संबंध असल्याचे मानले जाते. देशांतर्गत पातळीवर IRGC ‘Basij’ या स्वयंसेवक नेटवर्कचेही संचालन करते, जे अंतर्गत सुरक्षा आणि सामाजिक नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे IRGC ही फक्त युद्धासाठी नव्हे, तर सत्तेच्या टिकावासाठीही महत्त्वाची आहे. याच बहुआयामी ताकदीमुळे इराण अमेरिका आणि इस्रायलसारख्या शक्तिशाली देशांसमोर सहज झुकत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Join WhatsApp Group

Join Now