CSK | IPL 2026 दरम्यान Chennai Super Kings (CSK) आणि Royal Challengers Bangalore (RCB) यांच्यातील सामन्यात एक वेगळाच वाद उफाळून आला आहे. सामन्यादरम्यान वाजवण्यात आलेल्या “डोसा, इडली, सांबार, चटणी” या गाण्यामुळे चेन्नई संघाने नाराजी व्यक्त करत थेट Board of Control for Cricket in India (BCCI) कडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
नेमकं प्रकरण काय?:
5 एप्रिल रोजी बंगळुरूच्या M. Chinnaswamy Stadium येथे झालेल्या सामन्यादरम्यान हा प्रकार घडला. CSK चा आरोप आहे की त्यांच्या डावापूर्वी हे गाणे मुद्दाम वाजवण्यात आले, ज्यामुळे खेळाडू आणि संपूर्ण संघाची खिल्ली उडवण्यात आली.
फक्त गाणंच नव्हे, तर पब्लिक अॅड्रेस सिस्टीमवरून डीजेने काही टिप्पणी केल्याचाही CSK ने आक्षेप घेतला आहे. संघाच्या मते, अशा प्रकारच्या गोष्टी क्रिकेटच्या भावना आणि खेळाडूंच्या सन्मानाच्या विरोधात आहेत.
CSK | वादामागचं कारण आणि पार्श्वभूमी :
‘डोसा-इडली-सांबर-चटणी’ हे गाणं आधीपासूनच RCB-CSK सामन्यांमध्ये चर्चेत राहिलं आहे. यापूर्वीही एका खेळाडूच्या व्हिडिओमुळे हे गाणं व्हायरल झालं होतं आणि सोशल मीडियावर ट्रोलिंग झालं होतं. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये आधीच तणावाचे वातावरण तयार झाले होते.
गेल्या काही वर्षांत CSK आणि RCB यांच्यातील सामने ‘सदर्न डर्बी’ म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे 2024 पासून RCB ने CSK विरुद्ध सलग चार सामने जिंकले आहेत. त्यामुळे स्पर्धा अधिक चुरशीची झाली असून मैदानाबाहेरही त्याचा परिणाम दिसू लागला आहे.
दरम्यान आता BCCI कडून ही तक्रार स्वीकारण्यात आली असून आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल या प्रकरणाची चौकशी करणार आहे. या वादावर काय निर्णय घेतला जातो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.






