IPL 2026 | आयपीएल 2026 स्पर्धा सुरू होण्यास अवघे काही दिवस बाकी असताना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळे पॅट कमिन्स (Pat Cummins) सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नसल्याने संघाने डावखुरा फलंदाज इशान किशन (Ishan Kishan) याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. फ्रँचायझीकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
कमिन्सच्या गैरहजेरीत किशनकडे नेतृत्व :
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाने सोशल मीडियावर पोस्ट करत पॅट कमिन्स (Pat Cummins) दुखापतीतून सावरत असल्याची माहिती दिली. त्यामुळे आयपीएल 2026 च्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये तो मैदानात उतरणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कमिन्स संघात परत येईपर्यंत इशान किशन (Ishan Kishan) संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच युवा फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये प्रथमच या दोन्ही खेळाडूंवर नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
IPL 2026 | पहिला सामना आरसीबीविरुद्ध :
सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाचा आयपीएल 2026 मधील पहिला सामना 28 मार्च रोजी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Royal Challengers Bengaluru) संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात नाणेफेकीसाठी इशान किशन (Ishan Kishan) आणि आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार (Rajat Patidar) मैदानात दिसणार आहेत.
किशनच्या सध्याच्या फॉर्मचा विचार करूनच त्याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे मानले जात आहे. नुकत्याच झालेल्या टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये त्याने दमदार फलंदाजी करत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्णधारपदाचा अनुभव :
जरी आंतरराष्ट्रीय स्तरावर इशान किशन (Ishan Kishan) याला कर्णधारपदाचा जास्त अनुभव नसला, तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने नेतृत्व केले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) स्पर्धेत त्याने संघाचे नेतृत्व करत विजेतेपदही मिळवून दिले होते.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) मागील दोन हंगामांपासून सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे तो त्रस्त आहे. त्यामुळे आयपीएल 2026 च्या मध्यावर तो संघात परतेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






