CSK च्या संघात धोनीला स्थान नाही; ‘या’ माजी दिग्गज खेळाडूने इम्पॅक्ट प्लेयर म्हणूनही दिला नकार

On: March 20, 2026 5:13 PM
MS Dhoni Injury IPL 2026
---Advertisement---

MS Dhoni IPL News | IPL 2026 स्पर्धेची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे. 28 मार्चपासून स्पर्धेचा थरार सुरू होणार असून सर्वच संघ तयारीत आहेत. यंदाच्या हंगामात Chennai Super Kings कोणत्या प्लेइंग 11 सह मैदानात उतरणार याबाबत चर्चा रंगली आहे.

दरम्यान, भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) याने आयपीएल 2026 साठी चेन्नई सुपर किंग्सच्या संभाव्य 12 खेळाडूंची निवड केली आहे. मात्र त्याच्या संघात सर्वांना आश्चर्याचा धक्का देत महेंद्र सिंग धोनी (MS Dhoni) याला प्लेइंग 11 तर दूरच, इम्पॅक्ट प्लेयर म्हणूनही स्थान दिलेले नाही.

इरफान पठाणने निवडला असा CSK चा संघ :

इरफान पठाणने आपल्या युट्यूब चॅनेलवर सीएसकेसाठी संभाव्य संघ निवडताना काही धाडसी निर्णय घेतले. त्याने ओपनिंगसाठी Sanju Samson आणि आयुष म्हात्रे यांना पसंती दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार ऋतुराज गायकवाड याला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

मधल्या फळीमध्ये त्याने शिवम दुबे, Dewald Brevis आणि सरफराज खान यांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे सहाव्या क्रमांकासाठी त्याने धोनीऐवजी सरफराज खान अधिक योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.

MS Dhoni IPL News | धोनीबाबत पठाणचे स्पष्ट मत :

इरफान पठाणच्या मते, गेल्या काही हंगामांमध्ये धोनी शेवटच्या एक-दोन षटकांसाठीच फलंदाजीसाठी येताना दिसला. त्यामुळे संघाच्या रणनीतीच्या दृष्टीने हा निर्णय नेहमीच फायदेशीर ठरेल असे नाही. त्याच्या मते, एखादा खेळाडू खेळत असेल तर त्याने किमान चार षटकं तरी फलंदाजी करायला हवी. (Irfan Pathan CSK XI Prediction)

पठाणने असेही म्हटले की प्रत्येक महान खेळाडूच्या कारकिर्दीत एक वेळ येते जेव्हा त्याने संघाच्या भविष्यासाठी पुढे विचार करणे गरजेचे असते. त्यामुळे धोनीने आता संघ बांधणीवर लक्ष केंद्रित करणे योग्य ठरेल, असे त्याचे मत आहे. (MS Dhoni IPL News)

इरफान पठाणने निवडलेल्या संघात सातव्या क्रमांकावर कार्तिक शर्मा, आठव्या क्रमांकावर प्रशांत वीर यांना स्थान दिले आहे. फिरकी गोलंदाजीसाठी Akeal Hosein आणि नूर अहमद यांच्यावर जबाबदारी दिली आहे.

News Title: IPL 2026: Irfan Pathan Picks CSK Playing XI Without MS Dhoni, Even Drops Him as Impact Player

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now