IPL 2025 | आयपीएल 2025 च्या पाचव्या सामन्यात आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स हे दोन संघ एकमेकांशी भिडणार आहेत. दोघांचाही हा हंगामातील पहिलाच सामना असून, दोन्ही संघ नवे कर्णधार घेऊन मैदानात उतरणार आहेत. अहमदाबादमध्ये होणाऱ्या या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे. (IPL 2025 )
गुजरात आणि पंजाबची तयारी जोमात
गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व यंदा शुबमन गिलच्या (Shubman Gill) हातात देण्यात आलं आहे. तर पंजाब किंग्सने नवा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याची निवड केली आहे. या दोघांसाठी हा एक नवा अध्याय असणार आहे. सराव सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी दमदार कामगिरी केली असून, त्यांच्या संघरचनेवरूनही त्यांच्या तयारीची झलक दिसून येते.
25 मार्च रोजी होणारा हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल, तर त्याआधी 7 वाजता नाणेफेक होईल. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधात असून, मैदानावर तीव्र चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
कुठे आणि कसे पाहाल थरारक सामना?
क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येणार आहे. तर मोबाईल आणि डिजिटल माध्यमांवर जिओ-हॉटस्टार अॅपवरून सामना लाईव्ह स्ट्रीम केला जाईल. यामुळे घरबसल्या चाहत्यांना सामना पाहण्याची संधी मिळणार आहे.
पंजाब किंग्सच्या संघात जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंगसारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. तर दुसरीकडे गुजरात टायटन्सकडे जोस बटलर, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि शाहरुख खानसारखे सामर्थ्यशाली खेळाडू आहेत. दोन्ही संघांच्या संतुलित रचनांमुळे हा सामना रंगतदार होणार, हे निश्चित.
Title : IPL 2025 GT vs PBKS Battle today









