MS धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! धोनी अजून एक वर्ष..

On: May 20, 2024 12:19 PM
MS Dhoni
---Advertisement---

IPL 2024 | चेन्नई सुपर किंग्जचे आयपीएलमधील आव्हान आता संपुष्टात आलं आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नईचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये धडक मारली. त्यानंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय. तो म्हणजे महेंद्रसिंह धोनी आता निवृत्ती घेणार की त्याचा हाच सामना शेवटचा होता?, याबाबत आता क्रिकेटविश्वात वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

आयपीएल 2024 चा हंगाम हा एमएस धोनीचा (MS Dhoni) शेवटचा हंगाम होता,असं बोललं जात आहे. बंगळुरुविरुद्ध धोनीने शेवटचा सामना खेळला. आता लवकरच धोनी निवृत्तीची घोषणा करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग?

अशात माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि भारतीय संघाचा खेळाडू मोहम्मद शमीने यांनी महत्वाचं विधान केलं आहे. त्यांनी धोनीच्या निवृत्तीबाबत मोठं भाष्य केलं आहे.त्यामुळे सध्या फक्त आणि फक्त धोनीची चर्चा सुरू आहे.

गेल्या दोन वर्षांपासून हीच चर्चा होते आहे की, धोनीचा शेवटचा हंगाम असेल. यावेळी देखील आयपीएल 2024 च्या हंगामातील धोनीचा बंगळुरुविरुद्धचा सामना अंतिम होता, असं बोलत आहेत.मी यापूर्वी देखील म्हटलं आहे की, धोनी या आयपीएलमध्ये याबाबत घोषणा करेल आणि हसत-हसत निवृत्ती घेईल.

धोनी निवृत्ती घेणार?

मात्र चेन्नईने प्ले ऑफमध्ये स्थान मिळवलं (IPL 2024 ) नसलं तरी धोनी चांगलं क्रिकेट खेळलं आहे. त्यामुळे धोनी पुढील वर्षी आला तर त्याला शुभेच्छा आणि नाही आला, तर त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असं वीरेंद्र सेहवाग याने म्हटलं आहे.

यासोबतच मोहम्मद शमीने देखील प्रतिक्रिया दिली आहे. “मला देखील यावर्षी वाटलं होतं की हा धोनीचा आयपीएलमधील शेवटचा हंगाम असेल. पण, माही ज्या प्रकारे क्रिकेट खेळला ते बघून वाटत नाही तो निवृत्तीचा निर्णय घेईल, असं मोहम्मद शमी म्हणाला आहे. पाहायला गेलं तर, अद्याप धोनीने निवृत्तीबाबत काहीही सांगितलं नाहीये. त्यामुळे तो काय निर्णय घेणार ते आगामी (IPL 2024 ) काळात दिसून येईलच.

News Title – IPL 2024 Virender Sehwag reaction to MS Dhoni retirement

महत्त्वाच्या बातम्या-

एमएस धोनीच्या आयपीएल निवृत्ती संदर्भात मोठी अपडेट; जाणून घ्या धोनी CSK ला कधी निरोप देणार?

दुःखद घटना; राष्ट्राध्यक्षांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन

फोर्ड कंपनी बाजारात धुमाकूळ घालणार; नवीन SUV कारची एंट्री

महत्वाची बातमी! हवामान विभागाने मान्सूनबाबत दिली महत्त्वाची अपडेट

राज्यातील ‘या’ दिग्गजांचं भवितव्य आज ठरणार! लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा कसा असणार?

Join WhatsApp Group

Join Now